लॉकडाऊनचे कारण दाखवून बिस्किटांची टंचाई, दुकानांमध्ये छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री
माजलगांव,प्रतिनिधी:- शहर व तालुक्यात लॉकडाऊनचे कारण पुढे करत विविध बिस्किटांची छोट्या – मोठ्या दुकानांमधून छापील किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे .
लॉकडाऊनमध्ये अनेक किराणा दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रयल केला होता . ग्राहकांच्या तक्रारीनंतर तहसील कार्यालयाने याची दखल घेत अशी विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर व्यापाऱ्यांनीही आपआपल्या दुकानात दर्शनी ठिकाणी भाव फलक लावून रास्त भावात जीवनावश्यक वस्तुंची विक्री केली . परंतु लॉकडाऊननंतरच्या काळात विविध कंपनीच्या बिस्किटांची चढ्या भावाने विक्री केली जात आहे .
त्याचबरोबर अनेक कंपन्यानी त्यांच्याच कंपनीचे इतर उत्पादने काही बिस्कीट बॉक्स सोबत खरेदी करण्याची सक्ती केली . मोठ्या दुकानदारांना परवडत नसतानाही नाईलाजास्तव दुकानदारांच्या या वस्तु माथी मारले .या दुकानदारांना परवडत नसल्याने व कंपनीने दिलेले सक्तीचे उत्पादने छोटे दुकानदार घेत नसल्याने मोठ्या दुकानदारांना नाईलाजास्तव जादा दराने बॉक्सची विक्री करावी लागत असल्याचे समजते.
छोट्या दुकानदारांना हे परवडत नसल्याने हे दुकानदार छापील किंमतीपेक्षा एक रुपया ज्यादा दराने विक्री करताना दिसत आहेत . नित्याच्या खाण्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आसणारे बिस्कीट हे प्रत्येक घरात लहान बालकांपासुन थोरामोठ्यापर्यंत सर्वच जण सकाळी चहा सोबत मोठ्या आवडीने खातात . लॉकडाऊनच्या काळात सर्वच नागरिकांनी बिस्किटांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती .
त्यावेळेस निर्धारित मुल्यातच ही बिस्किटे ग्राहकांना उपलब्ध झाली होती . मात्र लॉकडाउन उठल्यानंतर ग्राहकांना बिस्किटे ही निर्धारित भावापेक्षा जास्तीचे पैसे मोजून खरेदी करावा लागत आहेत . शिवाय पाहिजे तेवढ्या प्रमाणात ग्राहकांना दिली जात नसल्याने एक प्रकारे बिस्किटांची कृत्रिम टंचाई केली जात असल्याचे ग्राहकांतून बोलले जात आहे . यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे .
नियमाचे उल्लंघन
• पॅकेजिंग केलेले खाद्यपदार्थ है छापील किंमतीनुसार विक्री करणे बंधनकारक असताना शासनाचा नियम पायदळी तुडवत ग्राहकांच्या खिशावर बिनबोभाटपणे कात्री चालवली जात असताना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे .
“दुकानदारांना छापील किंमतीपेक्षा जादा दराने कोणतीच वस्तू विकता येत नसून , दुकानदारांनी देखील अशाप्रकारे विक्री ,करु नये . कुणी दुकानदारांनी छापील किंमतीपेक्षा जादा दराने वस्तू विक्री केल्यास ग्राहकांना ग्राहक मंच किंवा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते . -संजय सोळंके , अध्यक्ष किराणा असोसिएशन , माजलगांंव
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});