लॉकडाऊन मध्ये अ‍ॅड प्रज्ञेश सोनावणे यांनी साकारली महामानवांची चित्रे

0 100

ठाणे,मिलिंद जाधव-कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गेली अडीच महिन्यापासून लॉकडाऊन, संचारबंदी लागू असल्याने सर्वांना घरीच रहावे लागत आहे. घरी राहून प्रत्येकजण आपापले वेळेचे नियोजन करत आहेत, अशा वेळेचा सदुपयोग म्हणून अनेकजण आपापला छंद जोपासत आहेत. यातच ठाणे शहरातील अॅड. प्रज्ञेश सोनावणे (कवी, लेखक, वक्ते) यांनी जोपासली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून त्यांनी आपल्या चित्रकलेतून महामानवाच्या प्रतिमा साकारल्या आहेत. त्यात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्यामाई होळकर, श्रीमंत मल्हारराव होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शहाजीराजे भोसले, सम्राट अशोक, महाराणा प्रतापसिंह, संत कबीर, ऊर्दू शायर मिर्झा गालिब, अल्बर्ट आईन्स्टाईन, लोकशाहीर वामनदादा कर्डक अशा विविध प्रकारची चित्रे अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी साकारली आहेत.

 

अ‍ॅड प्रज्ञेश सोनावणे हे एक सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, वक्ते आणि प्रबोधनकार असून त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये संधीचं सोनं करत आपल्या कलेला बोलकं केलं आहे. आणि समाजात एक सामाजिक संदेश सुद्धा दिलेला आहे.

 

महामानवांचे विचारांचे आचरण आपण सगळ्यांनी करावे म्हणून नेहमी प्रबोधनाच्या माध्यमातून महामानवांचे विचार जनमाणसांत पोहचवण्यासाठी मी वेळेचा सदुपयोग करून घरात बसून महामानवांच्या विविध प्रतिमा साकारल्या आणि विशेष म्हणजे माझा एक कविता संग्रह सुद्धा लिहून झालेले आहे. असा वेळ पुन्हा भेटणार नाही. असे अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी बोलताना सांगितले.

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या पुणे जिल्हा सचिवपदी शीतल शेखे

 

script async src=https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js/script

ins class=adsbygoogle

style=display:block

data-ad-format=autorelaxed

data-ad-client=ca-pub-1232538928057048

data-ad-slot=9070704187/ins

script

(adsbygoogle = window.adsbygoogle && ).push();

/script

error: Content is protected !!