लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम

0 136

मुंबई – देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने परत एकदा राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून 18 मे ते 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्यात लॉकडाऊन वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसेच झाले आहे. राज्यात कोरोना संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते. राज्यात रुग्णसंख्येनुसार चार झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे रेड आणि कटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कडक होतील अशी शक्यता आहे, तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंद शिथिल करून उद्योगांना चालना दिली जाईल अशी शक्यता आहे.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

बिग ब्रेकिंग न्यूज – परभणीत शहरात कोरोनाचा चौथा रुग्ण पाॅझिटिव्ह; शहरवासियांमध्ये घबराट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे 17 मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत कायम राहणार आहे. याचबरोबर या लॉकडाऊन दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

राज्यात सलग तीन दिवस दीड हजाराच्या पुढे रुग्ण सापडल्याने कोरोना संकट अधिकच गंभीर बनले आहे. पुणे, ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर येथील आकडे झपाट्याने वाढत आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी आणखी 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

ब्रेकिंग न्यूज – बीड जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण पाॅझिटिव्ह; जिल्हा ग्रीन झोनमधून आँरेंज झोनमध्ये

रेड झोन (हॉटस्पॉट क्षेत्र) सवलत नाही

कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. या भागात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. तसेच, कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नाही. जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी केली जाईल. त्या भागाच्या सुरक्षा क्षेत्रात व्यस्त असलेले कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना फक्त परवानगी राहिल.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी

जूनमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे इथून पुढचा काळ हा वाढत्या रुग्णसंख्येचा असण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर्स, विलगीकरण केंद्रे आणि कोरोना दवाखाने उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

लुडो, कॅरम, पब्जीत तरूणाई लॉकडाऊन

मुंबईत शनिवारी आणखी 884 रुग्ण सापडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 18,396 वर पोहोचली आहे. राज्यातही 1606 नव्या रुग्णांची भर पडल्याने महाराष्ट्राची एकूण रुग्णसंख्या 30,035 झाली आहे. 9 मार्च ते 16 मे म्हणजे दोन महिने 6 दिवसांत रुग्ण संख्येने हा तीस हजारांचा टप्पा पार केला. मुंबईत आतापर्यंत 696 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शनिवारी 24 तासांत 41 बळी गेले. मृत्यू पावलेल्या या रुग्णांपैकी 27 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला. तर 14 जणांचा बळी 7 ते 12 मे या कालावधीत झाला.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

ब्रेकिंग – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात मुंबईहून आलेल्या 8 रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण नाहीत, त्यांना सवलत मिळू शकते. नियमितपणे या भागांचा आढावा घेवून काही भागात थोडी सवलत दिली जाईल. सवलत देण्यापूर्वी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करण्यासाठी सर्व उपाय केले जातील, जेणेकरून कार्यालय, कार्यस्थळ, कारखाने किंवा संस्थांमध्ये सामाजिक अंतर कायम ठेवले जाईल.

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

किसान योजनेतील २००० रुपयांचा लाभ मिळाला नसेल तर ‘अशी’ करा तक्रार



error: Content is protected !!