वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाधिक कमाईची स्पर्धा अन् रुग्णांचा रिकामा होतोय खिसा
माजलगांव,प्रतिनिधी :- माजलगांव च्या आरोग्य क्षेत्रास जशी जेष्ठ डॉकटरांची गौरवशाली परंपरा आहे तशी नवख्या डॉकटरांची आता सर्वाधिक कमाईची सर्वाधिक श्रीमंतीची जीवघेणी स्पर्धा या गौरवशाली परंपरेला काळवंडून टाकत असल्याचे जाणवत आहे पण या स्पर्धे पायी गोरगरिब जनता आशा अडचणीच्या समयी खाजगी सावकाराकडून बेभाव व्याजाने कर्ज घेऊन रुग्णालयाचे अव्वाच्या सव्वा बिल भरत आहेत .
माजलगांवच्या आरोग्य क्षेत्रात डॉ प्रकाश आंदगवकर , डॉ तोष्णीवाल , स्व . डॉ.लोढा , स्व.डॉ.व्ही.व्ही.उरणे , डॉ . वारकरी यांची गौरवशाली परंपरा आहे . हातगुण काय असतो ते या डॉक्टरांच्या दवाखान्याला भेट दिल्यावर कळते .
आजही लाकडाची खुर्त्या या दवाखान्यात पहायला मिळतात . तरीही रुग्णांची तोबा गर्दी असते.अनेक रुग्ण डॉक्टर साहेब बाहेरगावी गेले तर दुखणं अंगावर काढतील किंवा एखाद्या एमडीला दाखवल्यावरही त्यांचं समाधान होणार नाही .
डॉ साहेब आल्यावर त्यांना पुन्हा दाखवणार हा आहे जेष्ठ डॉक्टरचा हातगुण . आज मात्र नवख्या डॉक्टर त गुणवत्तेची स्पर्धा नसून एकाने ६० लाखाची गाडी घेतली की दुसरा ७० ची घेतो लगेच तिसरा ८० लाखाची घेतो.कोणाच्या जीवावर तर रुग्णाच्या जीवावर त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन त्याला आजारपणाची भीती दाखवून ही कमाईची स्पर्धा माजलगांव मध्ये सुरू आहे .
या सर्व बाबीवर कसलाही अंकुश आरोग्य प्रशासनाचा नसल्यामुळे हे साधल्या जात आहे.काही नवख्ये डॉक्टर ही चांगली सेवा देत आहेत हे नाकारता येणार नाही.पण सर्वच डॉक्टरांनी रुग्णाला व रुग्णाच्या पालकांना ‘ आनंद ‘ होईल अशी सेवा देऊन आपल्या ‘ सुशील’वागण्याने समाधान देणे आवश्यक आहे .
ऑपरेशन नगरला तर तपासणीही नगरलाच
माजलगांव येथील गोरगरीब नागरिक नगरच्या आनंदऋषी हॉस्पिटलधे डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करून आल्यानंतर येथील नेत्रतज्ञ या रुग्णांना गरज पडल्यास आता नगरलाच जा म्हणून सल्ला देत असल्याचा किस्सा मागील महिन्यात एका महिले सोबत घडला . ही महिला एका माजी आमदाराकडे या ३ ही नेत्रतज्ञाची तक्रार घेऊन गेली यानंतर माजी आमदाराच्या एका आवाजातच नेत्रतज्ञ ताळ्यावर आल्याची घटना ताजी असताना हा बालरोगतज्ज्ञचा दुसरा किस्सा मागील आठवड्यात घडला.
आयकर विभागाने लक्ष देण्याची गरज
केवळ १० ते १५ वर्षाच्या प्रैक्टिसमध्ये ५-५मजली करोडो रुपयांच्या आलिशान इमारती , ५० ते ६० लाख रुपयांची चारचाकी वाहन या बालरोगतज्ज्ञाकडे कोठून आली याची चौकशी आयकर विभागाने करायला हवी .
इमारतीही नियमबाह्य
काही बालरोगतज्ज्ञ च्या इमारती या नियमबाह्य असून , पार्किंगला जागा नसल्यामुळे भर रस्त्याचा वापर पार्किंगसाठी आणि पार्किंगच्या जागेचा वापर व्यापारी गाळे काढून किराया वसुलीसाठी केला जातो.एका बालरोगतज्ज्ञाची इमारत तर गायरान जमिनीवर अतिक्रमण असून स्थानिक प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत .
आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});