“वैद्यनाथ” चा बारावीचा निकाल उत्कृष्ट, विज्ञान ९७•४९% , वाणिज्य ८६•१५%, कला ६•४१% तर व्या. अभ्यासक्रम ६०%‌

0 132

परळी वैजनाथ, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी/ मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी लागला .यात येथील वैद्यनाथ महाविद्यालयाने आपल्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असून बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९७•४९% इतका उत्कृष्ट दर्जाचा लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ८६•१५%इतका असून कला शाखेचा निकाल ६६•४१% व व्यावसायिक अभ्यासक्रम विभागाचा निकाल ६०% लागला आहे.

तसेच ७५% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३६ असून विज्ञान शाखेचे २८ तर वाणिज्य व कला शाखेचे प्रत्येकी चार-चार विद्यार्थी मेरिटमध्ये आले आहेत. ए ग्रेड मिळविणारे विज्ञान शाखेतून १९० ,वाणिज्य शाखेतून २६ तर कला शाखेतून ४८ विद्यार्थी आलेले आहेत.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर के इप्पर, उपप्राचार्य डॉ .व्ही. जे. चव्हाण , डॉ. जे ‌.व्ही.जगतकर, प्रा. एस .एम. सूर्यवंशी, पर्यवेक्षक प्रा .डॉ.एस. आर. सूर्यवंशी तसेच जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोरजी लोहिया, उपाध्यक्ष श्री फुलचंदराव कराड, डॉ. दे.घ. मुंडे, सचिव श्री दत्ताप्पा इटके, कोषाध्यक्ष श्री सुरेशकुमार अग्रवाल, सहसचिव डॉ सुरेशचंद्र चौधरी व श्री विजयजी वाकेकर यांचेसह इतर पदाधिकारी संचालक व प्राध्यापकांनी हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिले आहेत.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!