सिद्धी विनायक कामथ यांना “कोविड योद्धा सन्मान”
मुंबई – समाजसेविका सिद्धी विनायक कामथ या नेहमीच आपल्य़ा सामाजिक आणि कला क्षेत्रांत अग्रेसर असतात. सध्या कोरोना या विषाणूने मुंबई, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात कहर केला असून क्रित्येक जण या कोरोना मुळे मृत्युमुखी पडले आहेत़ तर काहीजण या विषाणूची लागण झाल्यामुळे इस्पितळात अड्मिट झाले आहेत़ असं असताना या कोविड १९ आपत्ती काळात आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्य़ा विभागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निरपेक्ष भावनेने अहोरात्र कार्य करणार्या समाजसेविका सिद्धी विनायक कामथ यांच्या सामाजिक कार्याची सर्वतोपरी दखल घेऊन भारतीय महाक्रांती सेना या संस्थेतर्फे प्रमुख मान्यवर आणि मानद सदस्य यांच्या संमतीने त्यांना कोविड योद्धा सन्मान प्रदान करुन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.