सुंदरराव सोळंके महाविद्यालयाची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम

0 147

माजलगांव, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सुंदरराव सोळंके महाविद्यालयाने विज्ञान शाखेत ८८.५७ %, कला शाखेत ६१.८४%, वाणिज्य शाखेत ८८.३३%. व्यवसायिक अभ्यासक्रम ७८.४०% निकाल लागला असून महाविद्यालयाने प्रति वर्षा प्रमाणे यावर्षीही यशाची परंपरा कायम राखली आहे.

सुंदरराव सोळंके महाविद्यालयात शाखानिहाय निकला मध्ये विज्ञान शाखेत प्रथमेश पाटील (८७.२३%). प्रथम , सृष्टी बाराहाते (८३.७९%) द्वितीय, दत्ता कोरडे व राजकुमार रामदासी (८०.७६%) तृतीय. कला शाखेमध्ये वैष्णवी शिंनगारे (८२.३०%) प्रथम , स्वाती तौर (79.53%) द्वितीय.अफरोज शेख (७९.०७%)तृतीय , वाणिज्य शाखेमध्ये साक्षी जाधव (९०.७६%) प्रथम, अविनाश सोळंके (८२.७६%) द्वितीय, वैष्णवी सोनवणे (८०.१५%) तृतीय क्रमांक पटकावुन यश संपादन केले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे म. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आ. सतिशभाऊ चव्हाण, माजी आ. राधाकृष्ण होके पाटील,ऍड भानुदासराव डक,सत्यप्रकाश रुद्रवार, डॉ बी.एल. चव्हाण,प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, उपप्राचार्य पवन शिंदे, उपप्राचार्य प्रकाश गवते, प्रबंधक प्रशांत चव्हाण यांनी अभिनंदन केले.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!