सोयाबीन सीड कंपन्या विरूध्द गुन्हे दाखल करा..
- कृषी विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीत आ.सोळंके यांच्या सुचना.
माजलगांव, प्रतिनिधी:- माजलगांव मतदार संघातील माजलगांव, धारूर व वडवणी तालुक्यातील सोयाबीनच्या निकृष्ठ बियान्याबाबत आज दि.८/०७/२०२० रोजी उपविभागीय कृषी अधिकारी, तिन्ही तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी व तिन्ही तालुक्यातील पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये घेतलेल्या आढाव्या मध्ये माजलगांव तालुक्यात ४७६ शेतकर्यांना सोयाबीनच्या निकृष्ठ बियानाबाबत तक्रारी केल्या असुन त्या पैकी २२५ शेतकर्याचे पंचनामे झालेले आहेत.
तसेच धारूर तालुक्यात ३३४ शेतकर्यांना तक्रारी केली असुन त्यापैकी १७९ शेतकर्यांचे पंचनामे झालेले आहे व वडवणी तालुक्यात २३४ शेतकर्यांनी तक्रारी केली असुन त्यापैकी १६९ शेतकर्यांचे पंचनामे झाले आहे. या निकृष्ठ बियाण्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली असल्यामुळे संबंधी अधिकार्याची बैठक घेवुन बैठकीमध्ये इगल सीड,महाबिज, ग्रीन गोल्ड सह ७ कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना आ.प्रकाशदादा सोळंके यांनी उपविभागीय कृषी अधिकारी श्री.मडके व इतर अधिकार्यांना दिल्या तसेच शेतकर्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे व ग्राहक मंचातुन शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवुन देण्याच्या सुचना दिल्या तसेच सोमवार पर्यंत पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल
स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});