२०० एकर गावठाण जमिनीवरील अतिक्रमणावर कारवाईची मागणी, अन्यथा आत्मदहनाचा इशारा

0 125

मनमाड, प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील वनविभागाची मात्र देखभालीसाठी या ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलेल्या सुमारे दोनशे एकर गावठाण जमिनीवर अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे.तर काही गाव पुढाऱ्यांनी जागा आखून शेती तयार केली आहे.सबंधित विभाग अथवा महसूल विभागाने याबाबत चौकशी करण्याची मागणी येथील मेंढपाळ भागा दगू काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे याबाबत संबंधितावर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही ही त्यांनी दिला आहे.

पानेवाडी ता.नांदगाव येथे वनविभागाची शंयभर ते सव्वाशे एकर पडीत जमिन असून मी मेंढपाळ आणि गुरांना चारण्यासाठी उपयोगी पडते. तसेच त्यामध्ये एक पाणी साठवणुकीसाठी एक गावतलळे शासनाने बनविले आहे , मात्र त्यामध्ये एका पदाधिकाऱ्याने जमिन काढली आहे ही सर्व शासकीय जमिन देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली असल्याची माहिती असून या जमिनीतून अनेकजण माती , मुरुम उचलून नेतात आणि जो- तो सोयीनुसार जमिनी काढून घेतल्या असून जागा आखून ठेवल्या आहे . तसेच ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अंकुश कातकडे याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून आता त्याची पत्नी ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी गावतळे बुजवून त्यावर जमीन तयार केले आहे महिलांना कपडे धुण्यासाचा आणि मेंढपाळांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .

तसेच या जमिनीवर अशाच अनेक नागरीकांनी अतिक्रमण केले असून शासकीय जमिन हडपण्याचा प्रयत्न सुरु असतांना याबाबत वारंवार तक्रार करुनही महसूल विभाग तलाठी , ग्रामपंचायत कारवाई करीत नाही . उलट भी तक्रार केल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली जाते . त्यामुळे शासकीय पातळीवरून तातडीने कार्यवाही करावी. याबाबत विभागाच्या कार्यालयाकडून दखल घेऊन कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही या तक्रारीद्वारे दिला असून माझ्या जीवीतास काही झाल्यास याची सर्व जबाबदारी आपल्यावर राहिल असेही काळे यांनी म्हटले आहे.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!