निफाड विधानसभा मतदार संघासाठी आमदार निधीतून ४ कोटी ७० लाख निधी मंजूर
रामभाऊ आवारे
निफाड,दि 28 ः
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून निफाड विधानसभा मतदार संघाच्या विकास कामांसाठी सुमारे रु.४ कोटी ७० लाखांच्या विकास कामांना निधी मंजूर होऊन प्रशासकीय मान्यता मिळाली आहे अशी माहीती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली आहे.
उंबरखेड येथे आदिवासी वस्तीत सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), बेहेड येथे आदिवासी वस्तीत सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), गोरठाण येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वॉलकंपाऊंड करणे (रक्कम रु.१० लाख), शिरवाडे वणी येथे मातंग वस्तीत सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), पालखेड येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), आहेरगाव येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१५ लाख), लोणवाडी येथे दलित वस्तीत सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), कुंभारी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस वॉलकंपाऊंड करणे (रक्कम रु.१० लाख), पंचकेश्वर येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), शिवडी येथे सामाजिक सभागृह बांधणे (रक्कम रु.१० लाख), जळगाव येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), सुंदरपूर येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), कसबे सुकेणे येथे दोन ठिकाणी सभामंडप बांधणे (रक्कम रु.२५ लाख), खेरवाडी येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), शिंपीटाकळी येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), रसलपूर येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), रेडगाव येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), ब्राम्हणवाडे येथे सभामंडप* बांधणे (रक्कम रु.१० लाख), पिंपळगाव बसवंत येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१५ लाख), नांदूर खुर्द येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), नांदूर्डी येथे मातंग वस्तीत सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), रानवड येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), नैताळे येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), शिवरे येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), कुरुड्गाव येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), पिंपळस येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), चांदोरी येथे दोन ठिकाणी सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), दारणासांगवी येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), सायखेडा येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख)करंजी खुर्द येथे सभामंडप बांधणे (रक्कम रु.१० लाख), चापडगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे (रक्कम रु.१० लाख), चेहडी खुर्द येथे चौक*श सुशोभीकरण करणे (रक्कम रु.१० लाख), उगाव येथे समाज मंदिर बांधणे (रक्कम रु.१० लाख), सोनेवाडी व ओणे येथे ग्रामपंचायत इमारत बांधणे (प्रत्येकी रक्कम रु.२० लाख), चांदोरी येथे संरक्षक भिंत बांधणे (रक्कम रु.१० लाख), कोठुरे येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (रक्कम रु.१० लाख), शिंगवे येथे सभागृह बांधणे (रक्कम रु.१० लाख) आदी विकास कामांबरोबर प्रांत व तहसिल कार्यालययीन कामकाजाकरीता संगणक, प्रिंटर, स्कनर उपलब्ध करून देणे (रक्कम रु.१० लाख ४८ हजार) व निफाड येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयास ETS मशीन उपलब्ध करून देणे (रक्कम रु.९ लाख ५५ हजार), कसबे सुकेणे व पिंपळस रामाचे उपकेंद्र ३३/११ के.व्ही.वर एसडीटी ट्रान्सफार्मर बसविणे (रक्कम रु.२५ लाख ९७ हजार) आदी विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.