लाॅकडाऊन 4.0 संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा जरुर वाचा
31 मे 2020 पर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन चालू ठेवा; केंद्र सरकारचा आदेश
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने भारत सरकारची मंत्रालये/विभाग, राज्य सरकारे व राज्य अधिकारी यांना, 31 मे 2020 पर्यंत राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे चालू ठेवण्यास सांगितले आहे.
देशासह राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने परत एकदा राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून 18 मे ते 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्यात लॉकडाऊन वाढण्याचे स्पष्ट संकेत मिळत होते आणि तसेच झाले आहे. राज्यात कोरोना संकट गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते. राज्यात रुग्णसंख्येनुसार चार झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे रेड आणि कटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कडक होतील अशी शक्यता आहे, तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंद शिथिल करून उद्योगांना चालना दिली जाईल अशी शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या घोषणेप्रमाणे 17 मे पर्यंत लॉकडाऊनची मुदत आहे. आता पुन्हा लॉकडाऊनची मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्यात आली आहे. राज्यासह देशभरात लॉकडाऊन 31 मे पर्यंत कायम राहणार आहे. याचबरोबर या लॉकडाऊन दरम्यान रेड, ग्रीन आणि ऑरेज झोनमध्ये कोणत्या उपाययोजना हाती घ्याव्यात, याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…
लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम
लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !
अबब ! चीनमध्ये कोरोनाबाधित ६ लाख ४० हजार रुग्ण; ८४ हजार रुग्णसंख्या खोटी
तळीरामांसाठी खुशखबर… येथे करा अर्ज; घरपोच मिळेल मद्य
लुडो, कॅरम, पब्जीत तरूणाई लॉकडाऊन
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय-उपमुख्यमंत्री अजित पवार
किसान योजनेतील २००० रुपयांचा लाभ मिळाला नसेल तर ‘अशी’ करा तक्रार