नुतन आयुक्त देविदास पवार यांनी पदभार स्विकारला

0 292

परभणी , प्रतिनिधी –शहर महानगर पालीकेचे नुतन आयुक्त देविदास पवार यांनी आज २१ मे रोजी दुपारी ३ वा. पदभार स्विकारला. यावेळी उपायुक्त जायभाये यांनी नुतन आयुक्तांचा सत्कार केला.

मावळते आयुक्त रमेश पवार यांचा सत्कार उपायुक्त गणपत जाधव यांनी केला.यावेळी मा़वळते आयुक्त रमेश पवार यांनी मनपातील सर्व कर्मचारी अधिकाºयाचे सहकार्याबद्दल आभार मानले. अनुभव चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत. शहरातील सर्व नागरिकांनी माणूसकीचे दर्शन घडले आहे.या शहरात मला मान मिळाला आहे ते मी कधीही विसरू शकणार नाही. पालकमंत्री नवाब मलीक, खा. संजय जाधव, आ.सुरेश वरपूडकर, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.राहुल पाटील, आ.सौ. मेघना बोर्डीकर इतर आमदार यांचे सहकार्य लाभले तसेच महापौर सौ.अनिता सोन कांबळे,उप महापौर भगवान वाघमारे, सभागृहनेते सय्यद समी उर्फ माजुलाला, स्थायी समिती सभापती गुलमीर खान, विरोधीपक्षनेते व सर्व गटनेत्याचे सहकार्य लाभले. शहरातील पत्रकार मिडीयांचेही आभार मानतो. पदभार देत असतांना सर्व अधिकारी व कर्मचाºयांचे सहकार्य लाभले. देविदास पवार हे चांगल्या प्रकारचे अधिकारी आहेत.मनपातील सर्व कर्मचारी अधिकारी चांगले आहेत सदैव सहकार्य लाभले आहे उत्तमरित्या काम करत आहे. मराठवाड्याला मी कधीही विसरू शकणार नाही. यापुर्वी लातूर व परभणी येथे काम केलेले आहे. येथील मयाळू व दिलदार असलेल्या नागरिकांना कधीही विसरणार नाही. देविदास पवार यांनी रमेश पवार बोलल्याप्रमाणे चांगले काम केले आहे. या शहरात या पुर्वी मी अकरावी बारावी, बालविद्यामंदिर शाळेत शिकलो. अ‍ॅग्री वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण घेतले. तसेच परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद विभागात काम केलेले आहे. सन १९९७-९८ मध्येही येथे काम केले. शहरात सुधारणा करणे आवश्यक आहे.मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारणा करावी लागेल. आर्थिक बळ मिळाल्या शिवाय नागरिकांना सुविधा देता येणार नाही. चांगले काम केल्यास नागरिकांकडून घरप्ट्टी वसुल होवून आर्थिक परिस्थिती सुधारेल. पालकमंत्री नवाब मलीक,खासदार,आमदार यांचे सहकार्य घेवून विकास करू. विकासासाठी निधी उपलब्ध करावा लागेल.विविध विकास योजनेसाठी प्रस्ताव सादर करू.शहरात कोवीड-१९ यावर मात करण्यासाठी सर्वांनी काम करावे. तसेच शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती करावी. असे आवाहन नुतन आयुक्त देविदास पवार यांनी केले. यावेळी सर्व विभागाची बैठक घेवून पुढील दिशा शहरातील स्वच्छता ,आर्थिक नियोजन करणार. यावेळी नुतन आयुक्त यांनी पदभार स्विकारला.

 

पाटोदा तालुक्यात खळबळ, पहिल्यांदाच सापडले रुग्ण

error: Content is protected !!