प्रथमेश भगत ह्यांच्यातर्फे बदलापुर गावात नागरिकांना “अर्सेनिक अल्बम-३०” होमियोपॅथिक सुमारे 2 हजार गोळ्यांचे मोफत वाटप
लॉकडाउन दरम्यान युवासेना उपशहर अधिकारी प्रथमेश सुनिल भगत ह्यांच्याकडून विविध उपक्रम राबविले
बदलापुर, जाफर वणू – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरीता कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून Medilife company nagpur ह्या होमिओपॅथिक कंपनीकडून “अर्सेनिक अल्बम-३०” च्या 3 लाख गोळ्या वामन म्हात्रे ह्यांनी संपूर्ण बदलापुर शहराकरिता मागविले होते. कारण या “कोरोना वायरस” च्या संसर्ग टळत नसल्यामुळे बदलापुर शहरात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे लक्षात येताच बदलापुर कार्यसम्राट शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष वामन (दादा) म्हात्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीबांचे आधारस्तंभ तथा कार्यसम्राट नगरसेवक कै. सुनिल (दादा) शिवराम भगत ह्यांचे चिरंजीव लाड़के युवा नेते तथा युवासेना उपशहर अधिकारी प्रथमेश सुनिल भगत ह्यांनी बदलापुर गांव वॉर्ड क्र.20 या विभागातील सर्व सोसायटीत जाऊन सुमारे 2000 नागरिकांना याची माहिती देत गोळ्याचे वाटप करण्यात आले. या गोळ्या वाटप करतेवेळी सोशल डिस्टेंसिंगची विशेष काळजी घेण्यात आली असुन याचा लाभ परिसरातील संपूर्ण नागरिकांनी घेतला आहे.
त्याचबरोबर या गोळ्या कश्या घ्यायचे 1) सलग तीन दिवस सकाळी उपाशीपोटी दिवसातुन एकदा 3 गोळ्या घ्याव्यात. 2) गोळ्या झाकणात काढून जिभेवर ठेवाव्या हात लाउ नये. 3) गोळ्या पाण्यासोबत घेऊ नये. 4) गोळ्या घेण्या अगोदर किवा घेतल्यानंतर 30 मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये. तसेच ह्या औषधामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ति वाढते व कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होतो. या होमियोपॅथिक औषधाचा कोणताही साइट इफेक्ट होत नसल्याचे प्रथमेश भगत ह्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच प्रभागातील नागरिकांनी ह्यांचे आभार व्यक्त केले.
त्याच बरोबर गोरगरिबांचे आधारस्तंभ तसेच कार्यसम्राट नगरसेवक कै सुनिलदादा शिवराम भगत ह्यांच्या आशीर्वादाने राजकारणात प्रवेश करणारे व समाज कार्याचा विडा उचलणारे आमचे लाडके युवा नेते प्रथमेश सुनिल भगत ह्यांनी कोरोना (covid – 19) या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता मा. नगरसेविका श्रीमती सुवर्णा सुनिल भगत आणि प्रथमेश सुनिल ( दादा ) भगत ह्यांच्यातर्फे विविध समाज उपयोगी कामे करण्यात आली.
१. दि. ११/४/२०२० रोजीपासून ते दि. 24/5/2020 रोजीपर्यंत मोफत भोजनसेवा सुरु आहे. या भोजनसेवेला तब्बल 43 दिवस पूर्ण झाले.
2)प्रथमेश दादांच्या माध्यमातून बदलापूर गावात 6000 मास्क व 4000 डेटोल साबण देखील वाटप करण्यात आले
३.गावातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता ज्या बिल्डिंग मध्ये कोरोना रुग्ण सापडले त्या बिल्डिंग मध्ये स्वतः प्रथमेश दादा उभे राहून औषध फवारणी व जंतुनाशक धुराची फवारणी सुद्धा नियमित करून घेतात.
४. गरजू हातावर पोट असणारे लोक, विधवा स्त्रिया व रिक्षाचालक ह्यांना सुद्धा मोफत धान्यवाटप करण्यात आले.
५. तसेच कोरोना विरुद्ध लढणाऱ्या युद्धासाठी बदलापूर गावात येऊन योग्यती खबरदारी उपाययोजना दादांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. तसेच अश्याप्रकारे विविध उपक्रम राबविण्यात आले.
याप्रसंगी युवासेना उपशहर अधिकारी प्रथमेश सुनिल भगत, शिवसेना उपशाखा प्रमुख अनिकेत पवार, विभागप्रमुख रामचंद्र यादव, युवासेना अधिकारी रमेश साळुंखे, महिला गटप्रमुख सौ. सुरेखा रमेश म्हात्रे, शिवसैनिक विनीत खांबेकर तसेच विठ्ठल फुलवरे, निलेश आयरेकर, महेश आयरेकर, संजय भगत, कैलाश राउत, शाम कंबरी, सुनिल कंबरी ह्यांच्यासह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.