कोरोनाचा हाहाकार ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 31 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 67
परभणी प्रतिनिधी – जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी (दि.26) रात्री साडेआठ वाजता नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आणखीन 31 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.
कुठे आढळले किती रुग्ण
पूर्णा 10
सेलू 2
गंगाखेड 4
पालम 1
जिंतूर 2
परभणी 12
एकूण 31
जिंतूर तालुक्यातील सावंगी (भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शासकीय यंत्रणेत सुध्दा प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः दिवसेंदिवस संशयितांसह कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतील तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींच्याही वाढीने प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 265 संशयितांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबित होते. त्यापैकी 34 अनिर्णायक आहेत. रविवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 36 पर्यंत असतांना सोमवारी राञी पर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नाही. परंतू मंगळवारी रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास अहवाल प्राप्त झाला.
पोलिसाने वाचवला आत्महत्या करणाऱ्या कामगाराचा जीव; मदत म्हणून दिले १० हजार रुपये
राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात आले-मुख्यमंत्री
राज्यातील लघु उद्योगांसाठी पॅकेज-उद्योगमंत्री सुभाष देसाई
पंकजाताई मुंडे शनिवारी करणार पहिल्या ‘लाईव्ह’ पाणी परिषदेचे उदघाटन
बीड : धक्कादायक दिवसभरात ८ रुग्ण कोरोना पाँझिटिव्ह