बीड : धक्कादायक दिवसभरात ८ रुग्ण कोरोना पाँझिटिव्ह

0 127

बीड (प्रतिनिधी): -जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तात दरोज वाढ होत आहे. आज मंगळवारी दिवसभरात एकूण आठ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल ‌पाॅझिटीव्ह‌ आले आहेत. कोरोनाने आज परळी आणि शिरूर का. तालुक्यातही शिरकाव केल्याचे स्पष्ट झाल्याचे सध्या फक्त अंबाजोगाई तालुका कोरोना विरहित राहिला आहे.

सोमवारी पाठविल्या पैकी ०७ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी दोघांचे अहवाल आज पाॅझिटीव्ह‌ आले. हे दोघेही बीड शहरातील आहेत, तर उर्वरित ०५ अहवाल अनिर्णीत आहेत. आज मंगळवारी ३० संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. २२ अहवाल निगेटिव्ह असून २ प्रलंबित आहेत. आजच्या सहा पाॅझिटीव्ह‌मध्ये परळी तालुक्यातील हाळंब येथील ०२, शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथील ०१, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील ०१ आणि वाहली येथील एकाचा समावेश आहे. आजच्या आठ रुग्णांसह जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ४७ झाली आहे.

कोरोनाचा हाहाकार ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 31 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 67

पोलिसाने वाचवला आत्महत्या करणाऱ्या कामगाराचा जीव; मदत म्हणून दिले १० हजार रुपये

राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात आले-मुख्यमंत्री

राज्यातील लघु उद्योगांसाठी पॅकेज-उद्योगमंत्री सुभाष देसाई

पंकजाताई मुंडे शनिवारी करणार पहिल्या ‘लाईव्ह’ पाणी परिषदेचे उदघाटन


error: Content is protected !!