परभणी जिल्ह्यातील …….. हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
परभणी प्रतिनिधी – जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मंगळवारी (दि.26) रात्री साडेआठ वाजता नांदेड येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार आणखीन 31 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे.
आज सायंकाळपर्यंत एकही अहवाल न आलेल्या परभणी जिल्ह्यात रात्री आठ वाजता 152 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात एकूण 31 रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने संपूर्ण जिल्हाच हादरला आहे.
खालील सर्व परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
परभणी शहर– त्रिमुर्तीनगर, इटलापूर मोहल्ला, शास्त्री नगर, कारेगाव रोड, नागसेन नगर व नानलपेठ आणि लगतचा परिसर
परभणी तालुका – मौ. कारेगाव हद्द
पूर्णा – कमलापूर
सेलू – देवगाव फाटा ग्रामपंचायत हद्द, मौ. चिकलठाणा बु.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 265 संशयितांचे स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबित होते. त्यापैकी 34 अनिर्णायक आहेत. रविवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 36 पर्यंत असतांना सोमवारी राञी पर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नाही. परंतू मंगळवारी रात्री उशिरा साडेआठच्या सुमारास अहवाल प्राप्त झाला.
कोरोनाचा हाहाकार ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 31 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 67
जिल्ह्यातील कोणकोणत्या परिसरात किती रुग्ण आढळले वाचा सविस्तर