जळगाव वृद्ध महिला मृत्यूप्रकरण : अधिष्ठातांसह अन्य कर्मचाऱ्यांना केले निलंबित

0 111

जळगाव,लियाकत शाह- जळगावमध्ये कोरोना बाधित‌ महिला गायब होती. तिचा‌ मृतदेह शौचालयात‌ सापडला. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान वृद्धेचा मृतदेह शौचालयात आढळून आल्याप्रकरणी राज्य सरकारने कारवाईची बडगा उगरला आहे. याप्रकरणी अधिष्ठाता तसेच इतरांना निलंबित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा सिव्हिल रुग्णालयातून आठ दिवसांपासून ही कोरोनाबाधित वृद्ध महिला बेपत्ता होती. जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, प्राध्यापक, नर्स आणि सुरक्षारक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे दिली. कोरोनाबाधित वृद्ध महिला बेपत्ता असल्याची कोणालाच कल्पना नव्हती. ज्यावेळी काही लोकांना रुग्णालयाच्या बाथरुममधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. त्यानंतर ही बाब उघड झाली की, कोरोनाबाधिक वृध्द महिलेचा मृतदेह शौचालयात पडला होता. जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनीही वृद्ध महिलेच्या मृत्यूची पुष्टी केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलच्या शौचालयात त्याचा मृतदेह पडलेला होता हे खरे आहे. दरवाजा आतून बंद होता.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी का गुलाबी झाले ? वाचा लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होण्यामागे शास्त्रीय कारण

 

error: Content is protected !!