राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त बदलापुर शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम संपन्न

0 257

बदलापुर, जाफर वणू-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांच्या सहकार्याने शहरातील आदिवासी भागातील विधवा माता भगिनींना मोठ्या प्रमाणात धान्य वाताप करण्यात आले. ह्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गेल्या 3 महिन्यात शहरातील लॉकडाऊन दरम्यान ज्या लोकांनी समाजसेवा, गोरगरिबांना मदतीला धावून गेले, डॉक्टर, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग, पत्रकार, अशा बऱ्याच लोकांना प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा करण्यात आला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बदलापूर शहरात दरवर्षी काही ना काही उपक्रम राबविण्यात येत असे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांच्या सूचनेनुसार ह्या वर्षी रक्तदान शिबिर घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला आहे. तसेच शहरातील तिन्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लाऊन गोरगरीब ह्यांना अन्नदान केले.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख ह्यांनी पोलिसांना कोरोना योद्धा म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिमचे सारिपुत्र, पूर्वचे गणेश देशमुख, ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे ह्यांना सन्मानित केले. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कालीदास देशमुख, हेमंत रुमने, अविनाश देशमुख, अनिसा खान, हेमंत येशवंतराव, दिनेश धुमाळ, सौ. धुमाळ ताई, तुषार बलिद,सायली बलिद, विद्या बैसणे, ज्योती वैद्य ह्यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागातील उपविभागीय अधिकारी अभियंता एसिबिच्या जाळ्यात

 

error: Content is protected !!