वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४६ जागांमध्ये वाढ

0 206

मुंबई: धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असून या विद्यार्थ्याचा हा प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून झाला आहे. राजकोट येथील डॉ. जिगरकुमार सामाणी हा या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमा घेणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याने सोमवारी महाविद्यालयात हजेरी लावली.

तब्बल ३१ वर्षानंतर म्हणजे महाविद्यालय स्थापनेनंतर या वैद्यकीय महाविद्यालयात ११ विषयांसाठी ४६ विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले होते.

धुळे येथे १९३९ मध्ये भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाची स्थापना करण्यात आली.अखेर ३१ वर्षाने या महाविद्यलयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात झाली, याकरिता महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, डॉ. गिरीश ठाकरे, डॉ. संजय राठोड, तसेच समन्वयक डॉ. दीपक शेजवळ, डॉ. मूकरम खान तसेच सर्व प्राध्यपकांनी आभार व्यक्त केले.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या या उर्वरित जागांवर लवकरच विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होणार असून, त्यामुळे धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, दुर्बल घटकातील रुग्णांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच यामुळे २४ तास तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे.

मंत्री श्री. देशमुख यांनी, या शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून वैद्यकीय विद्यार्थांना आधुनिक पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण मिळावे, आणि रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेच महाविद्यालयातील अध्यापकांची रिक्त पदे भरणे, रुग्णालयास अत्यावश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात येईल, शिवाय महाविद्यालयाची आणि रुग्णालयाची प्रगती कारणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

‘या’ राज्यात वाढवला ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन

 

error: Content is protected !!