महावितरण ऑफिस मध्ये ‘मनसे’ आक्रमक, विजबिलांची होळी व आंदोलन

0 101

मध्य प्रदेशात शासनाने प्रति महिना शंभर रुपये वीज बिल दिले मग महाराष्ट्रात का नाही?अतुल वांदिले
हिंगणघाट, दशरथ ढोकपांडे – घरघुती वीज ग्राहकांचे वीज बिल पूर्णपणे माफ करा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात mseb चे मुख्य कार्यकारी अभियंता यांचा मार्फत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळे गरीब,मजूर व मध्यम वर्गातील लोकांचा हाताला काम उरलेले नाही. अनेक ठिकाणी व्यवसाय, छोटे-मोठे उद्योग बंद पडलेले आहे राज्यात अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच कारणामुळे जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. सामान्य जनता शासनाकडे मदतीची वाट पहात आहे. जिल्यातील संपूर्ण ठिकाणी विजेचे बिल दुप्पट-तिप्पट आलेले आहे सामान्य माणूस एवढे बिल भरणार कुठून तसेच ‘मध्य प्रदेशातील शासनाने प्रति महिना शंभर रुपये वीजबिल प्रत्येक वीजबिल धारकास आकारले मग हे आपल्या महाराष्ट्रात का होऊ शकत नाही.? आज सामान्य लोकांचा हाताला कामे नाही एकीकडे लॉकडाऊन दुसरीकडे रोजगार बंद असल्याने संपूर्ण कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वीजबिल भरण्यास नागरिकानंकडे पैसे नाहीत त्यामध्ये वीजबिल दुप्पट-तिप्पट आले त्यामुळे सर्व सामान्य नागरिक वीजबिल भरू शकत नाही.

करीता शासनाना माझी नम्र विनंती आहे की आपण नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारू नका ते बिल पूर्णपने माफ करा तसेच आपण कोरोनाचा काळात कोणाचेही वीज (लाईट) कापू नये अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना इलेक्ट्रिक ( MSEB) ऑफिस वीज पूर्णपणे खंडित करेल.

यावेळी उपस्थित मनसे जिल्हाउपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हासचिव सुनील भुते, वा.सेना जिल्हासंघटक रमेश घंगारे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, गोमाजी मोरे, प्रल्हादजी तुळाळे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे, राजू सिन्हा, सुनील खेकारे, प्रशांत एकोणकर, अमोल ठाकरे,सागर सहारे, शेखर ठाकरे, राजेश रोकडे, अजिंक्य साबळे, परम बावणे, विनोद बोरकर, हर्षल लाखे, मंगेश हुलके,आदित्य उरकुडकर, शुभम लक्षणे,सय्यद मुस्ताक, हरीश वाघ,आदी पदाधिकारी व मनसेसैनिक उपस्थित होते।

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात चार महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे अशात बऱ्याच लोकांचा नौकऱ्या गेल्या, गोर, गरीबाच्या, मजूर लोकांचा हाताला काम नाही.अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहे, शहरात मोठ्या प्रमाणात मिल कामगार आहे त्यांना ४-५ महिन्यापासून वेतन मिळाले नाही अशा परिस्थतीत ते वीजबिल भरणार कुठून ते स्वतःचा व कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवत असेल याचा विचार करायला हवा आज त्यांच्यावर त्यांचा कुटुंबाची जबाबदारी आहे अशा गंभीर परिस्थित विजेचे बिल दुप्पट-तिप्पट प्रमाणात वाढून आलेले आहे. या माय-बाप सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी संपूर्ण वीजबिल माफ करावे. तसेच जनतेनी वीज बिल न भरल्यास त्यांची लाईट कापण्यात आली की महाराष्ट्र नवनिर्माण सेना MSEB लाईट कापेल. मी आवाहन करतो की कोणीही वीज बिल भरू नये जर MSEB चा कर्मचारी वीज कापण्यासाठी घरी आला की आम्हाला सांगा.
– अतुल वांदिले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धा

धक्कादायक… मेथी समजून करून खाल्ली गांजाची भाजी आणि मग…
read more – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?



error: Content is protected !!