‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी विजयसिंह डुबल
पुणे,प्रतिनिधी – महाराष्ट्र बॉटल्ड वॉटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह डुबल यांची ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ’ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेंद्र टण्णा आणि राष्ट्रीय सचिव व्ही.के.बंसल यांनी डुबल यांना नियुक्तीचे पत्र दिले.
‘सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये विजयसिंह डुबल हे व्यापारी उद्योजक आणि उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील’,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विजयसिंह डुबल हे सोलापूर जिल्ह्यातील आजनसोंड ( पंढरपूर ) येथील रहिवासी असून पुण्यामध्ये त्यांचे उद्योगाचे कार्यक्षेत्र आणि मुख्य कार्यालय आहे. सॅव्ही प्युअर अॅक्वा प्रा.लि.या कंपनीचे ते संस्थापक आहेत. ‘कोरोना साथीच्या काळात व्यापारी, उद्योजक आणि उद्योगांना सर्व पातळीवर अडचणींना तोंड द्यावे लागत असून या अडचणी सोडवणे, सरकार दरबार चे प्रश्न सोडवणे, मनोधैर्य उंचावणे,’ हे काम प्राधान्याने करणार आहे, असे विजयसिंह डुबल यांनी सांगीतले.
मागील महिन्यात बाटलीबंद पाणी निर्मिती, मिनरल वॉटर निर्मिती उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची असोसिएशन सदस्यांबरोबर झूम मीटिंग करून वीज दर, कर्जासंबंधीच्या अडचणी सोडविल्या होत्या.
परभणीत जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू; केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा – जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});