परभणीत जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू; केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा – जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर

0 199

परभणी प्रतिनिधी – जिल्ह्यात प्रशासनाने अतिशय योग्य नियोजन करून कोरोनाचा शिरकाव होण्यापासून रोखले होते. परंतु मागील काही दिवसांत बाहेर गावावरून येणार्‍या नागरिकांमुळे परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून दि. 2 जूलैच्या रात्री 12.00 पासून ते दि. 5 जूलै रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.

lokseva ad

परभणी महानगरपालिका व लगतचा ३ किलोमीटर परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर पंचायत हद्दीमध्ये तसेच लगतच्या ३ किलोमीटर परिसरात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहेत.

यांना मिळणार सवलत
या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
– दुध विक्रेते (केवळ सकाळी 6 ते 9. एका ठिकाणी थांबून दूध विक्रीस बंदी)
– खत वाहतूक, त्यांची गोदामे / दुकाने, त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार
– राष्ट्रीयीकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदार यांच्याकडून चलनाव्दारे पैसे भरणा करून घेणे या बाबीकरिता.

लोकसेवा मल्टिसर्व्हिसेस Lokseva Multiservices

याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.

lok2

error: Content is protected !!