वर्षभर लढावे लागणार कोरोनासोबत, नियमावली लागू

0 220

शब्दराज वेब – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर राज्य सरकारांनी नवीन नियमावली तयार करून त्याच्या अंमलबजावणीला सुरूवात केली आहे. केरळ सरकारने सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुढील एक वर्षासाठी कोरोनाची नियमावली पाळण्याचे आदेश दिले असून आता नागरिकांना वर्षभर कोरोनासोबत लढावे लागणार आहे.

कोरोनासोबतच आता अनलॉकबद्दलही अनेक राज्ये विचार करू लागले आहेत. केरळ सरकारने तर लॉकडाउन काळातील काही नियम हे वर्षभर पाळावे लागतील, असा आदेशही काढला आहे. केरळ सरकारने रविवारी ही घोषणा केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. सरकारच्या नव्या आदेशांनुसार वर्षभर लॉकडाउनचे नियम लागू असतील.

* नवीन नियमावली
– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहन चालविताना मास्क बंधनकारक
– सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग
– विवाह समारंभासाठी केवळ 50 जणांनाच परवानगी. उपस्थित राहणार्‍या लोकांनाही मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य. दोघांमध्ये सहा फूटांचे अंतर हवे.
– अंत्यविधीवेळी 20 जणांना परवानगी
– कोरोना रुग्णाचा अंत्यविधी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार
– आंदोलन, धरणे, निदर्शने अशा कार्यक्रमांसाठी परवानगी अत्यावश्यक. कमाल दहा जणांनाच परवानगी. मास्क अनिवार्य.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई
– बाहेरील राज्यांमधून येणार्‍यांनी सरकारकडे ऑनलाइन नोंद करणे आवश्यक
– मॉल अथवा दुकानांमध्ये एकावेळी वीसहून अधिक लोक नकोत
– आंतरराज्य बस वाहतूक सेवा स्थगित
– नियम मोडणार्‍यावर कारवाईने केली घोषणा

पुर्ववैमनस्यातून बाप,लेक,सुन,आजा,नातू मिळून एकाला केले फ्रँक्चर
सेलूतील एसबीआय बँकेचा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह



error: Content is protected !!