मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर कर्तव्य दक्ष यांची मनमाड मध्ये पुन्हा रुजू करण्यास नागरिकांची मागणी
मनमाड, प्रतिनिधी – देशात व राज्यात या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रादुर्भाव बघून मनमाड शहरांमध्ये रुग्णांची वाढ होत असल्याने ऐनवेळी कर्तव्यदक्ष अधिकारी दिलीप मेणकर यांची 6/7/2020 ला अचानकपणे झालेली तडकाफडकी बदली व आजमितीला मनमाड शहराने कोरोनाबाधित चा आकडा हा शंभरीवर पोहोचला असून,6 बळी पडलेलं असतांना नेमकी शासनाची दुटप्पीपणा ची वागणुक संपुर्ण मनमाड करांच्या जिवावर बेतणारीच ठरेल.
मागील 6 वर्षापासून मनमाड नगरपालिका प्रशासनावर घट्ट पकड,प्रशासकीय अनुभव व कौशल्य असताना,मनमाड शहराच्या जिव्हाळ्याचा ज्वलंत असा पाणी प्रश्न हाताळताना करंजवन सारख्या योजना करता शासन दरबारी वेळोवेळी समर्थपणे बाजू मांडुन योजना मंजुरीसाठी अहोरात्र प्रयत्न केले,संपुर्ण मनमाड शहर व शहरवासीयांची इत्यंभूत माहिती असताना अश्या संकट काळात एकमेव असे अधिकारी दिलीप मेणकर आहे.
एकीकडे महाराष्ट्र शासनाने मालेगाव ची परिस्थिती हाताबाहेर जात असताना सुनिल कडासने सारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांना मालेगावची जवाबदारी देऊन संपुर्ण मालेगाव परिस्थिती वर नियंत्रण मिळवण्यात यश आले कारण अगोदर संपूर्ण मालेगाव शहर व तेथील सगळ्याच गोष्टीची इत्यंभूत माहिती ही सुनील कडासने यांना होती म्हणून शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊन सुनिल कडासने यांना जवाबदारी देऊन मालेगाव च्या हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.
मात्र मनमाडला सगळंच उलट घडलं आहे,मनमाड ची संपूर्ण माहिती असताना व आजपर्यंत कर्तव्यदक्ष पणे आपली ड्युटी बजावत असताना दिलीप मेणकर सारख्या अभ्यासुअधिकारी ची बदली म्हणजे मनमाड कर जनतेवर एक प्रकारे अन्याय च केल्याची भावना सर्व सामान्य जनतेतून व्यक्त होताना दिसून येत आहे.निदान मनमाड ची परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी दिलीप मेणकर सारख्याच अधिकाऱयांची ताबडतोब रुजू होऊन पालिकेची विस्कळीत झालेली घडी बसवावी.मनमाड कर जनतेला एकप्रकारे वाऱ्यावरच सोडल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल
स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});