अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त रंगणारऑनलाइन राष्ट्रीय मॉस्को साहित्य संमेलन

0 173

ठाणे, मिलिंद जाधव – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय व सांस्कृतिक संमेलन मॉस्को रशिया संयोजन समितीच्या वतीने राष्ट्रीय मॉस्को साहित्य संमेलनाचे १८ जुलै २०२० ते १ ऑगस्ट २०२० पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सातारा येथून ऑनलाईन, झूम अँप च्या माध्यमातून हे साहित्य संमेलन रंगणार आहे.

साहित्य संमेलनाचे उदघाटन विचारवंत जेष्ठ साहित्यिक डॉ. आ .ह. साळुंखे करणार आहेत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद बाबुराव गुरव भूषवणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून रशियन सेंटर ऑफ सायन्स अँड कल्चर डायरेक्टर सर्गेय फानदेव असून त्यांच्या हस्ते ”अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी गौरव पुष्ममाला” पुस्तक प्रकाशन होणार आहे.

तर पुस्तक परिचय माणिक आढाव करून देणार असून, साहित्य संमेलनाचे प्रास्तावित अमर गायकवाड तर भूमिका भगवान अवघडे व आभार डॉ. अनिल जगताप करणार आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर भाषणे सादर होणार असून महाराष्ट्रातील कवी अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना कवितेतून उजाळा देणार आहेत . तर अध्यक्षीय भाषणातून जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव गुरव हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार आहेत.

अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रीय मॉस्को साहित्य संमेलनाचे आयोजन रशिया येथे करण्यात आले होते. परंतु कोरोना व लोकडाऊनमुळे हे ” राष्ट्रीय मॉस्को साहित्य संमेलन” आपण शासनाच्या नियमांचे आपण करून यावर्षी ऑनलाइन आयोजन केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य घराघरात पोहचविण्याचे काम आम्ही करणार आहोत म्हणून हा ”राष्ट्रीय मॉस्को ऑनलाइन साहित्य संमेलन” आपण आयोजित करत आहोत. असे समितीचे तथा संविधान लोकजागर परिषदेचे अध्यक्ष भगवान अवघडे यांनी बोलताना सांगितले.

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!