रेल्वे उड्डाणपुलाच्या नित्कृष्ठ कामाच्या चौकशीसाठी क्वालिटी कंट्रोलचे पथक पूर्णेत दाखल

0 138

केदार पाथरकर
पूर्णा,दि 13 ः
पूर्णा शहरालगत होणाऱ्या सुमारे 98 कोटी एवढे बजेट असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात काही घोडचूका झाल्याचे वृत्त दै शब्दराज ने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे मुंबई चे क्वालिटी कंट्रोल मॅनेजर एस आर सुनिल यांच्या नेतृत्वात एक पथक दाखल झाले असून त्यांनी दिवसभर ह्या कामाची देखरेख आणि चौकशी केली, दरम्यान त्यांना या कामात बऱ्याचशा त्रुटी दिसून आल्या आणि त्यासाठी त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश संबंधित कंत्राटदारास देऊन त्रुटी तात्काळ दूर करत असल्याचे दै शब्दराज प्रतिनिधींशी बोलताना सांगितले तसेच ह्या कामावरील दोन अभियंत्यांची तातडीने बदली केली असून त्याजागी दुसरे तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती केल्याचे सांगितले यानंतरही काही उणिवा आढळल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधा असे सांगितले यावरून आतातरी उड्डाणपुलाचे काम निश्चित मानकाप्रमाणे होईल अशी आशा पूर्णेकरांना आहे.

error: Content is protected !!