देवलगाव (आ.) येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
परभणी,दि 25 (प्रतिनिधी) ः
मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त( दि. 3) एप्रिल पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवार (दि.3) रोजी ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात होणार आहे. कथा प्रवक्ते म्हणून ह भ प रामायणाचार्य नामदेव महाराज फपाळ कथा निरूपण करणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे 4 ते 6 काकड़ा आरती, सकाळी 6 ते 10 ज्ञानेश्वरी परायण, त्यानंतर हरिपाठ जागर आणि रात्रि 9 ते 11 हरिकीर्तन होणार आहेत. हरिकीर्तनामध्ये रविवार (दि.3 ) रोजी हभप श्रीहरि महाराज आळंदीकर, सोमवार (दि.4 )रोजी महादेव महाराज नरवडे गुरुजी,मंगळवार 5 एप्रिल रोजी हभप आचार्य शिवेंद्र चैतन्य महाराज , बुधवार 6 एप्रिल रोजी हभप समाधान महाराज शर्मा, गुरुवार 7 रोजी प्रा.नीलेश महाराज कोरडे,शुक्रवार 8 रोजी हभप हरिदास महाराज दांगट,शनिवार 9 रोजी माऊली महाराज मुडेकर, रविवार 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 वेळेत हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज पळसखेडकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे.त्यानंतर रात्री 8 ते 10 हभप हरीषचैतन्य मनीषानंद पूरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. श्रीराम जन्मोत्सवातील धार्मिक कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवहान देवलगाव ग्रामस्थ, भजनी मंडळ अदिनी केले आहे.