पूर्णेत गुरुराज माऊलींच्या जयघोषात रंगला श्री गुरुबुद्धीस्वामी आणि नुनजुनडेश्वर माऊलींचा पालखी सोहळा
पूर्णा,दि 07 (प्रतिनिधी)ः
शहराचे ग्रामदैवत, सकल लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रीगुरुबुद्धीस्वामी मठ संस्थान येथे गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहसह, महाप्रसाद मानाची ‘खिर व हुलपल्ली’ व दिमाखदार भव्य पालखी सोहळा ”गुरूराज माऊलीच्या” जयघोषात मोठ्या भक्तीमय वातावरणात सोमवारी ४ एप्रिल रोजी रात्री हजारों भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.पूर्णा शहरातील लिंगायत समाज बांधवांचा येथिल श्री गुरुबुद्धीस्वामी मठ संस्थान येथिल पाडवा यात्रा महोत्सव विविध जाती-धर्माचे भाविक भक्त संतश्रेष्ठ श्री गुरू बुद्धीस्वामी यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून आवर्जुन येत असतात.मागील दोन वर्षे कोरोना संक्रमण काळात यात्रा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता.यंदा निर्बंध शिथिल झाल्याने पाडवा यात्रेनिमित्त मठसंस्थान येथे मागील आठ दिवसांपासून अखंड शिवनाम सप्ताहाचे तथा शिवकिर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.दररोज महाअभिषेक भजन किर्तन,जागर व सोमवारी ४ रोजी सकाळी श्री.नंदिकेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे काल्याचे किर्तन, दुपारी महाप्रसाद, सायं हजारो भक्तांच्या उपस्थितीत गुरुनुन्न्ड्डेश्वर महाराज व श्री गुरुबुद्धी स्वामी महाराज या गुरु शिष्याचा पालखी सोहळा रंगला होता,समाजातील सर्व थरातील मान्यवर आणि सामान्य या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.या कार्यक्रमास पूर्णा शहर तालुक्यासह परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर नांदेड,लातूर,हिंगोली, बीड, उस्मानाबाद,जालना,औरंगाबाद येथून आलेल्या १० ते १५ हजार भाविकांनी गुरूमाऊली च्या दर्शनाचा व महाप्रसाद माणाची खिर व कर्नाटकी हुलपल्लीचा लाभ घेतला. पालखी सोहळ्यास साठी येथिल गुरुराज माऊलीच्या जयघोषात पाऊली रिंगण खेळ खेळत शेंकडों महीलांनी आप आपल्या घरासमोर रांगोळ्याची आरास केली होती.ठिक ठिकाणी पालखीचे स्वागत केले. हा सोहळा शहरातील गणपती मंदिर, महादेव मंदिर,सराफा बाजार दत्तमंदिर या मार्गाने पालखी मिरवणूक मार्गस्थ होऊन ७ तासानंतर मंगळवारी ५ रोजी महाआरतीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.यावेळी यात्रा महोत्सव समितीच्या सदस्यांनी तसेच समाज बांधवानी अथक परिश्रम घेतले.
प्रसिद्ध खिर व हुलपल्ली’चे महात्म्य
या यात्रेत प्रसिद्ध असलेली
हूलपल्ली बनविण्यासाठी हरबऱ्याचे पिठ ,हरभरा दाळ ,चिंच ,शेंगदाणा,लाल मिरची,तेजपान, धने पूड,तेल,गुळ,वेलची, यांच्या मिश्रणाचा प्रामूख्याने वापर केल्या जातो.खिरीसाठी १० ते १२ क्विंटल गव्हाची खिर बनविण्यासाठी गुळ, विलायची , बडीसोप, खसखस,मिरेपूड, खोबरं, तांदूळ,तुप यांचा मुख्यत: वापर केला जातो मोठ्या कढईत ती तयार केली जाते. हि खिर बनवण्याचा मान येथील समाजातील पळसकर वाड्याला आहे.तेथील वयोवृद्ध व तरूण मिळून लज्जतदार गव्हाची खिर बनवितात.