पुढील ५ दिवस महत्त्वाचे,चार शहरांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा अलर्ट
राज्यातील तापमान दिवसेंदिवस भडकत आहे. अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीशी पार गेले आहे. त्यातच आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच, अतिआवश्यक असल्याशिवाय दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा देणारा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिलाय.तर, “पुढील ५ दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता”, असं ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.
विदर्भातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट
उष्णतेच्या झळांनी वैदर्भीयांना पुरते हैराण केले आहे . विदर्भातल्या चार जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असेच वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ , चंद्रपूर वर्धा , अकोला चार जिल्ह्यांमध्ये आजपासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील उष्णतेचा पारा सध्या ४४ अंशाच्या पुढे सरकला आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पारा असाच भडकत राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.