महापुरूषांच्या विचारांचा दिवा पेटवून खरी दिवाळी साजरी-डॉ. गोविंद रसाळ यांचे प्रतिपादन

0 82

 

परभणी, (27) बद्दलत्या परिस्थितीचा विचार करून दिपावलीच्या निमित्ताने परंपरेसह महापुरुषांच्या प्रतिमा आणि ग्रंथांचे पूजन करून आपण येणाऱ्या पिढीसाठी नवा आदर्श उभा करीत आहोत. आता पर्यंत आपण वित्त लक्ष्मीचेच पुजन पाहिले आहे, परंतु महापुरूषांच्या प्रतिमा आणि ग्रंथांचे पुजन करून विचार आणि ग्रंथ संस्कृती जपत पुढे नेण्याचे पवित्र काम या निमित्ताने होत आहे. म्हणजेच एका अर्थाने आपण खरी दिवाळी साजरी करीत आहोत असे मत परभणीतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. गोविंद रसाळ यांनी व्यक्त केले.
वसमत रोडवरील आबा ट्रेडर्स येथे दिपावलीच्या लक्ष्मीपुजन निमित्ताने महापुरूषांच्या प्रतिमा व ग्रंथांचे पुजन डॉ.रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सदरील कार्यक्रमास बाबुराव कारेगावकर, ज्ञानोबा कारेगावकर, डॉ.केदार खटिंग, डॉ. रामेश्वर नाईक, प्राचार्य नितीन लोहट, प्रा.डाॕ.जयंत बोबडे, प्रा. सुभाष ढगे, रणजित कारेगावकर, कांचनताई कारेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ऐतिहासिक महापुरुषांच्या प्रतिमा आणि ग्रंथांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ.रामेश्वर नाईक यांनी दिपावलीच्या शुभेच्छा देत म्हणाले,हा ज्ञानाचा दिप आज उजाळून विद्येचा प्रकाश पाडता येतो. ज्ञानाचा दिप लावल्याने तो वाढतच जातो असेही ते म्हणाले. यावेळी बाबुराव कारेगावकर, ज्ञानोबा कारेगावकर, डॉ.केदार खटिंग, प्राचार्य नितीन लोहट, सुभाष ढगे, कांचन कारेगावकर आदींनी मनोगत मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.जयंत बोबडे, सूत्रसंचालन रणजित कारेगावकर यांनी केले. यावेळी बाबूराव होनाळीकर, किरण भोगांवकर, सचीन माळवदकर, नंदकुमार हैद्राबादे, अशोक चांदणे, राजू महामूने, विष्णू मेहेत्रे, राजेश्वर गरूड, अंगद जवंजाळ, शेख रेहान, शरद सौदडकर, शेख अब्दुल, विश्वनाथ गुंजाळ, शेख मोहसीन, शेख चांद, रोहीत पाटील, नितीन जवंजाळ, वेदान्त माळवदकर, कुणाल भांगे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!