जगाची मंदीच्या दिशेनं वाटचाल, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

0 66

 मुंबई : जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात अर्थतज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या विकासदर वाढीच्या अंदाजाबाबत अर्थतज्ज्ञांनी पुन्हा एकदा साशंकता वर्तवली आहे. दुसरीकडे, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व केंद्रीय बँका व्याजदरात सातत्यानं वाढ करत आहेत.

अर्थशास्त्रज्ञांच्या मते, ‘बहुतेक प्रमुख अर्थव्यवस्था आधीच मंदीत आहेत, किंवा मंदीकडे वाटचाल करत आहेत. मात्र, मागील आर्थिक संकटांच्या तुलनेत या वेळी बेरोजगारीचा दर तुलनेनं कमी आहे. या मंदीत चार दशकांतील विकास दर आणि बेरोजगारी यांच्यातील सर्वांत कमी तफावत जाणवेल अशी अपेक्षा आहे.’

महागाईचा प्रभाव दीर्घकाळ दिसेल

‘मोठ्या अर्थव्यवस्थांसाठी मंदीचा हा कालावधी कमी असेल, पण महागाईचा प्रभाव दीर्घकाळ दिसून येईल,’ असं बहुतांश अर्थतज्ज्ञांनी सांगितलं. ‘बहुतेक जागतिक मध्यवर्ती बँकांचे व्याजदर दोन तृतीयांश पेक्षा जास्त आहेत, परंतु महागाई अजूनही त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे,’ असेही ते म्हणाले.

डॉइश बँकेच्या विश्लेषकाने सांगितलं की, ‘गेल्या 18 महिन्यांतील चलनवाढीचा अंदाज खराब होता. त्यातच जागतिक इक्विटी आणि बाँड बाजार गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. तर, यूएस डॉलर हा व्याजदराच्या अपेक्षेवर आधारित विदेशी चलन बाजारात बहु-दशकांच्या शिखरावर आहे.’

सर्वेक्षणातील ठळक मुद्दे

-257 पैकी 179 अर्थतज्ज्ञांनी सांगितलं की, येत्या वर्षात बेरोजगारीमध्ये तीव्र वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे ही मंदी विनाशकारी मंदी असणार नाही.

-26 सप्टेंबर- 25 ऑक्टोबर या कालावधीत 47 प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांच्या रॉयटर्स सर्वेक्षणानुसार, या वर्षी 2023 मध्ये जागतिक विकास दरातील वाढ 2.9 टक्क्यांवरून 2.3 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. तर, त्यामध्ये 2024 मध्ये 3 टक्क्यांपर्यंत वाढ होईल.

-या सर्वेक्षणातील 70 टक्के अर्थतज्ज्ञांनी सांगितलं की, त्यांनी ज्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास केलाय, त्यामध्ये जीवन संकटाच्या खर्चाची परिस्थिती पुढील सहा महिन्यांत आणखी बिकट होईल. इतर अर्थतज्ज्ञांना त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

-जर या अर्थतज्ज्ञांवर विश्वास ठेवला तर अमेरिकी फेडरल रिझर्व्ह 2 नोव्हेंबरला सलग चौथ्यांदा व्याजदर 75 बेस पॉईंट्सनं वाढवू शकते. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, ‘ही परिस्थिती तेव्हापर्यंत थांबवू नये, जोपर्यंत महागाईचा दर सध्याच्या दराच्या जवळपास निम्मा होत नाही.’

-चांगली क्षमता असूनही पुढील दोन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था मंदावण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ज्यात 2022-23 आर्थिक वर्षात सरासरी 6.9 टक्के आणि पुढील वर्षी 6.1 टक्के वाढ दर्शविली होती.

error: Content is protected !!