राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळेंनी घातली समजूत
सुत्रांची माहिती आहे. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना समजवायचा प्रयत्न केला. पण अजित पवार ऐकायला तयार नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
हे नेते अजित पवारांच्या बैठकीला
दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.
यांनी सोडली शरद पवारांची साथ
प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे
दरम्यान, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार राजभवाना दाखल झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजभवना आले आहेत. त्यामुळे पुन्हा एका शपथविधीची खेळ रंगण्याची शक्यता आहे.
कोणते आमदार घेणार शपथ?
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार मंत्रिपदाचही शपथ घेणार आहेत. यात काही ज्येष्ठ नेत्यांसह नव्या आमदारांचा समावेश आहे.
- दिलीप वळसे पाटील
- छगन भुजबळ
- निलेश लंके
- धनंजय मुंडे
- दौलत दरोडा
- अदिती तटकरे
- इंद्रनील नाईक