सेलूत “दिवाळी पहाट” कार्यक्रमाने रसिकांना केले मंत्रमुग्ध

कै आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम

0 71

सेलू ( नारायण पाटील )
कै अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था सेलूच्या वतीने दिवाळी निमित्त छत्रपती संभाजी नगर येथील कंठसाधना प्रस्तुत दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन दि १४/९/२३ मंगळवार रोजी करण्यात आले होते .
येथील केशवराज बाबासाहेब मंगल कार्यालयात आयोजित सेलूच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसा असलेल्या या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी चांगलीच गर्दी केली होती .विशेष करून महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती
यावेळी वर्षा जोशी ,वैभव पांडे व पूजा तोडकर यांनी गायलेल्या उठी उठी गोपाळा ,सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ,गोपाळा रे बासुरीवाला ,माझी रेणुका माऊली ,एरणीच्या देवा तुला ,बाई मी विकत घेतला शाम ,कानडा राजा पंढरीचा ,आली माझ्या घरी ही दिवाळी ,देव भावाचा भुकेला तसेच विष्णुमय जग यासारखी एका पेक्षा एक गाणी गाऊन अक्षरशः प्रेक्षकांची मने जिंकली .
कै अण्णासाहेब सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व उपस्थित निवेदक ,गायक व संगीत साथ देणाऱ्या कलाकारांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मनोगतात संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे यांनी स्पष्ट केले की ,गेल्या वर्षीपासून संस्थेच्या माध्यमातून आपण हा दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाचे आयोजन करून दिवाळी निमित्त रसिकांना गायनाची मेजवानी देण्याचा प्रयत्न केला आहे .तसेच सन्मान कर्तृत्वाचा ,केशवराज बाबासाहेब फिस्टिव्हल या सारखे कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे .या सर्व कार्यक्रमात सेलूकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून भविष्यात देखील या सोबतच अजूनही सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्याचा मानस असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले .
डॉ सुनील कुलकर्णी ,जयप्रकाश बिहानी ,विनायकराव कोठेकर ,शिवजी मालानी आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
सकाळी गुलाबी थंडी असताना देखील या कार्यक्रमासाठी संपूर्ण सभागृह खचाखच भरून गेले होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले .
यावेळी मुख्य गायक वैभव पांडे ,वर्षा जोशी ,पूजा तोडकर यांच्या सह शांतिभूषण देशपांडे ,गजानन धुमाळ ,राम हिवाळे ,ललित चोबे ,पंकज शिरभाते ,संदीप काळे आदींचा सहभाग होता .
सदरील कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर व लयबद्ध संचलन प्रसिद्ध निवेदक श्रीकांत उमरीकर यांनी केले .
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

error: Content is protected !!