माझी जात कोणती सर्वांना माहीत,व्हायरल ओबीसी दाखल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

0 23

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख ओबीसी असल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर शरद पवार गटाने भाजपावर सडकून टीका केली. तसेच व्हायरल दाखल खोटा असल्याचं सांगत पवारांचा खरा दाखल माध्यमांसमोर ठेवला. आता स्वतः शरद पवार यांनीच या व्हायरल दाखला आणि त्यांच्या जातीच्या चर्चेवर स्पष्ट भूमिका मांडली. ते मंगळवारी (१४ नोव्हेंबर) बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “माझा दाखला मी बघितला. तो दाखला मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात होतो तेव्हाचा तो दाखल आहे. तो दाखला खरा आहे. मात्र,काही लोकांना दुसरा इंग्रजीतील खोटा दाखला सोशल मीडियावर फिरवला. त्या दाखल्यात माझ्या नावासमोर ओबीसी लिहिलं. मला ओबीसी समाजाचा आदर आहे. मात्र, जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती मी लपवू इच्छित नाही. त्यामुळे संपूर्ण जगाला माहिती आहे की, माझी जात कोणती आहे.”

“मी जातीवर कधीच समाजकारण आणि राजकारण केलं नाही”

“मी जातीवर कधीच समाजकारण आणि राजकारण केलं नाही. तसेच भविष्यातही जातीवर समाजकारण, राजकारण करणार नाही. मात्र, त्या वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो काही हातभार लावता येईल तो मी लावेन,” असंही शरद पवारांनी नमूद केलं.

तरुणांची भावना तीव्र

मराठा आणि धनगर आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकार आणि केंद्राच्या अंतर्गत येतो. काही लोक काल इथे आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते लोक गेले. आरक्षण मिळावं ही तरुण पिढीची भावना तीव्र आहे. निर्णय घ्यायचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारकडे आहे. लोकांच्या या भावना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही ते करू, असं पवार म्हणाले.

error: Content is protected !!