मनोज जरांगे यांचे राज ठाकरेंना सणसणीत उत्तर..म्हणाले….
माझ्या आंदोलनामागे कोण आहे?, हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं, असं प्रत्युत्तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. मनोज जरांगेंना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव निर्माण कोण करतंय? असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यावर मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना सणसणीत उत्तर दिलं आहे. त्यासोबतच जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हेदेखील त्यांनी शोधावं, असंदेखील मनोज जरांगे म्हणाले आहे. मनोज जरांगे यांचा दौरा आज पुणे जिल्ह्यातील दौंड गावात आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाीह हात नसून हr मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले. त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते. आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. त्यासोबतच मराठआ समाजाला स्पष्ट माहित झालं आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत, असं ते म्हणाले.
24 डिसेंबरला ओबीसीतून आरक्षण घेणार
50 टक्के आरक्षण द्या, अशा चर्चा रंगत आहेत मात्र 50 टक्के आरक्षण आम्ही मागितलं नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण हवं आहे. 50 टक्के आरक्षण देणार असाल तर ते तुम्हीच घ्या 24 डिसेंबरला सगळं चित्र स्पष्ट होईल 24 डिसेंबरला ओबीसीतून आरक्षण घेणार यावर आम्ही ठाम आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं कोणतंच आरक्षण (Maratha Reservation) कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) म्हणाले होते. मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी अनेक विषयावर आपली मत मांडले होते.