विवेकानंद प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
सेलू / प्रतिनिधी
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित
विवेकानंद प्राथमिक विद्यालयात (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर शितोळे प्रमुख पाहुण्या म्हणून शालेय समिती अध्यक्ष करुणाताई कुलकर्णी होत्या. इयत्ता चौथीच्या प्रगती वर्गाच्या मुलांनी सूत्रसंचालन पद्य प्रास्ताविक आभार सादर केले. चि. आदित्य गिरी व समृद्धी काष्टे यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पहिली ते चौथीच्या विभाग प्रमुख रागिनी जकाते, दिपाली पवार,शारदा पुरी, काशिनाथ पांचाळ, चेतन नाईक , चंदू कव्हळे, अभिजीत पाचंगे यांनी परिश्रम घेतले.