जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी मराठा समाज
परभणी सकळ मराठा समाज बांधवांच्या बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर
परभणी / प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने निवडणुकी संदर्भात कोणती भूमिका घ्यावी यासाठी परभणी सकळ मराठा समाज बांधवांच्या वतीने आज दिनांक 28 मार्च 2024 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लोकसभेसाठी एक उमेदवार देण्यात यावा यासाठी मनोज जरांगे पाटील ज्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर उभे राहून हा उमेदवार निवडून आणूत असे सर्वानुमते ठराव घेऊन जाहीर करण्यात आले.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सकळ मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत मराठा समाजाने लोकसभा निवडणुकी संदर्भात कोणती भूमिका घ्यावी यावर विचार विनिमय करून मराठा समाजाने आपापल्या गावात जाऊन गावकऱ्यांसोबत चर्चा करून मराठा समाजाचा उमेदवार निवडणुकीत उभा करावा का या संदर्भात ठराव घेऊन तो कळवावा असे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदारसंघातील सकळ मराठा समाज बांधवाची बैठक 28 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील परभणी, जिंतूर गंगाखेड, पाथरी, परतुर,सेलू ,सोनपेठ,पालम, पूर्णा घनसावंगी ,मंठा या विधानसभा मतदार संघातील मराठा समाज बांधवा सह इतर समाजाचेही नागरिक उपस्थित होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील समाज बांधवांनी आपले भावना व्यक्त करत गाव पातळीवर जो निर्णय झाला त्याची माहिती सांगितली या सर्व चर्चेतून सर्वानुमते असे ठरवण्यात आले की आपल्या लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारा पैकी जो सर्व नियम अटीत बसून जो योग्य उमेदवार जाहीर करतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीर उभे राहून मतदानाच्या माध्यमातून विजयी करून असे ठरवण्यात आले.