सांगळेवाडी जि प शाळेला एचएआरसी संस्थेतर्फे 111 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट
'मोबाईल एडिक्शन व मानवी मूल्यांची जपवणूक' कार्यशाळा
परभणी,दि 29ः
दि 29 मार्च रोजी ज्ञानदान व पुस्तकदान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजवत पुस्तक वाचनाचा आनंद घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे जिंतूर तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा सांगळेवाडी येथे 111 पुस्तकांची ‘आनंदी वाचन पेटी’ भेट देण्यात आली. त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी खरंच ‘गुड फ्रायडे’ ठरला
आज गुड फ्रायडे ची सुट्टी असून सुद्धा सकाळी 9 ते 11 दरम्यान सांगळेवाडीच्या शाळेत ‘मोबाईल एडिक्शन व मानवी मूल्यांची जपवणूक’ विषयावर डॉ पवन चांडक यांनी घेतलेल्या कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी या नावीन्यपूर्ण उपक्रमास एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, नेमिनाथ जैन, राजेश्वर वासलवार, अक्षर आनंद वाचन चळवळचे जिल्हा समन्वयक प्रकाश डुबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
111 पुस्तकांची आनंदी वाचन पेटी भेट:
सांगळेवाडी जि प शाळेला वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी दिलेल्या ‘आनंदी वाचन पेटी’ मध्ये 111 पुस्तकांचा खजिना असून यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे, शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये चांगले चरित्र घडविण्यासाठी प्रा शिवा आयथळ यांच्या संकल्पनेतुन तयार केलेला 30 चांगल्या सवयीचा चार्ट शाळेला भेट देण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक यांनी हा अभिनव उपक्रम राबविण्यामागील हेतू स्पष्ट केला. ज्ञानदान व पुस्तक दान करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजवण्याचे व आत्मविश्वास निर्माण करण्याचे हे कार्य करताना अनेक दाते मदतीचा हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश डुबे यांनी अक्षर आनंद वाचन चळवळ विषयी माहिती देताना वाढदिवस वाचन, नववर्ष वाचन, महापुरुष जयंती वाचन, विविध उत्सवानिमित्त वाचन असे वाचनासाठी निमित्त शोधण्याचे आवाहन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पुंड तर आभार प्रदर्शन दिनकर घुगे यांनी केले. यशस्वीतेसाठी एचएआरसी टीम व गावकऱ्यांनी प्रयत्न केले.