मानेबोईनवाड यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

0 104

पूर्णा,दि 07 प्रतिनीधी: येथील पोलिस ठाण्यात सेवेत कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस हेड कॉन्स्टेबल साहेब नारायण मानेबोईनवाड यांची नुकतीच महाराष्ट्र पोलिस खात्याअंतर्गत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल पूर्णा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,सहाय्यक पोलिस निरीक्षक,दर्शन शिंदे,पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद क-हाळे, पोउनि ईंगोले,पोलिस कर्मचारी सतिश पिंपळे,सोनेराव जाधव,बंडू राठोड यांच्यासह आदी पोलिस अधिकारी,पोलिस हेड कॉन्स्टेबल,शिपाई यांनी पुष्पहार अर्पण करुन भावी वाटचालीस सुभेच्छा देत अभिनंदन केले.नवनिर्वाचीत ए एस आय मानेबोईनवाड हे नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालूक्यातील नांदा या खेडेगावातील रहिवाशी असून त्यांनी आपले शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत घेवून ते पोलिस सेवेत भरती झाले.त्यानंतर त्यांनी वर्ष २००८ ते २०१४ पर्यंत परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून तर त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात स्थानीक गुन्हे शाखेत उत्कृष्ट‌ सेवा बजावली.त्यानंतर काही दिवसानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल पदी निवड झाली.यानंतर २०१९ ते आजतागायत पूर्णा येथे हेड कॉन्स्टेबल पदावर राहून उत्कृष्ट‌ सेवा बजावल्यामुळे पोलिस खात्याअंतर्गत आता नुकतीच सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी निवड करण्यात आली.

error: Content is protected !!