सेलू कोचिंग क्लासेस असोसिएशनच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
सेलू( प्रतिनिधी )
‘कोचिंग सेंटर नियमन मसुदा’ मधील मार्गदर्शक सूचना मसुद्यातील निर्माण झालेल्या विविध समस्या विचारात घेऊन कायदा करण्यात यावा यासाठी सेलू कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले .केंद्र शासनाने दि. १६/०१/२०२४ रोजी वितरीत केलेल्या ‘कोचिंग सेंटर नियमन मसूदा मधील मार्गदर्शक सूचना मसुद्यात १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये ही सूचना शिथिल करण्यात यावी.
शाळेतील शिक्षकांबरोबरच कोचिंग क्लासेस मधील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पक्का करण्याचे काम करतात. सोळा वर्षे वयोगटाध्येच विद्यार्थ्यांच्या पायाभूत गोष्टी परिपूर्ण होणे आवश्यक असतात. सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद ही केंद्र सरकारच्या कायद्यातील मसुद्यात जी तरतूद ती रद्द करण्यात यावी .कोचिंग क्लासेस व्यवसायावर खाजगी शिक्षकांची उपजिवीका आहे.
तरी केंद्र आणि राज्य सरकारने सदर मसुद्याची अंमलबजावणी करताना या ’16वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग बंद’ ही सूचना रद्द करावी. यासाठी सेलू तहसिलदार यांना सेलू क्लासेस असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर असोसिएशन अध्यक्ष गुलाबराव ताठे, उपाध्यक्ष मनिष बोरगावकर , कोषाध्यक्ष शुकाचार्य शिंदे,सचिव निशिकांत पाटील, सहसचिव करण ठाकूर, सदस्य भागवत गायकवाड,वैभव खरात,चव्हाण दिलीप, कृष्णा गिराम, शेख महेमद साजिद, कवडे संदीप ,प्रवीण खंदारे,नारायण रोडगे, रमेश पौळ, बाळासाहेब मगर ,संतोष गुंजकर,दवे एस. बी., दत्ता चव्हाण, बी .एस.पावडे, आदित्य पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.