आई-वडिलांची मनोभावे सेवा हीच ईश्वरसेवा-हभप भास्कर नाना रसाळ

0 22

 निफाड,दि 12 ः
परमेश्वराने आपल्याला सुंदर मनुष्य देह दिला असून त्या जन्माचे सार्थक व्हावे म्हणून प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करणे महत्त्वाचे आहे.आई-वडिलांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे या समान असून जन्मदात्या आई-वडिलांनी दिलेल्या जन्माचे जीवन सार्थक होण्यासाठी नामस्मरण व पुण्यकर्मासाठी आई-वडिलांनी दिलेल्या जन्माच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा या दृष्टिकोनातून दशक्रिया विधी व पुण्यस्मरणाच्या क्षणी आध्यात्मिक कार्यक्रम घेऊन त्यांना सद्गती देणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आई-वडिलांची मनोभावे सेवा केली तर तीच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असून आपल्या जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातनाम व नामवंत रामायणाचार्य भास्कर नाना रसाळ आहेरगाव यांनी केले आहे.
वनसगाव ता.निफाड येथे आयोजित पत्रकार रामभाऊ आवारे  यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात कीर्तनाची निरूपण करताना ते बोलत होते.
कै विठ्ठलराव दादा आवारे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या जीवन कार्याला स्पर्श करत रामायणाचार्य हभप भास्कर नाना रसाळ यांनी रामायण व महाभारतातील विविध उदाहरणे, दृष्टांत ,दाखले देताना आवारे परिवाराने केलेली वडिलांची मनोभावे केलेली सेवा निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी कीर्तन निरुपणात सांगितले.
वनसगाव येथे आयोजित पुण्यस्मरण कार्यक्रमात कीर्तनाला संगीत साथ महाराष्ट्रातील नामवंत मृदंग अलंकार हभप ओंकार महाराज रायते खडक माळेगाव व ह भ प मंगेश महाराज निकम नांदुर्डीकर यांनी साथ केली. तर गायनाची साथ गानकोकिळा म्हणून सुप्रसिद्ध असलेले अखिल भारतीय वारकरी मंडळाचे निफाड तालुका उपाध्यक्ष ह भ प नवनाथ महाराज चव्हाण रेडगाव, ह भ प नवनाथ महाराज बत्तासे (सेल्फी) चांदगाव , स्वर्ग गंधर्व ह भ प ऋषिकेश महाराज नवले, ह भ प गि-हे महाराज, ह भ प योगेश महाराज गायकवाड, ह भ प केशव महाराज रायते,हभप भास्कर आप्पा गारे खानगाव, ह भ प ज्ञानेश्वर महाराज ढवळे ,ह भ प गणपत बाबा लगड,हभप उत्तम दादा शिंदे, हभप भाऊराव शिंदे, हभप ऋषिकेश महाराज मार्कड पिंपळगाव बसवंत, ह भ प नवनाथ माऊली बोरगुडे, हभप शंकर भवर, हभप अभिजीत दादा डुकरे,हभप शंकरराव कोल्हे, हभप आबा ढोमसे आदींनी केली तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी उत्कृष्ट भजनाची साथ केली. विणेकरी म्हणून ह भ प गणपत बाबा सानप शिवरे व भालदार चोपदार ज्ञानेश्वर माऊली शिंदे व दिनू अण्णा शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली.

याप्रसंगी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नासिक जिल्हा अध्यक्ष ह भ प निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव ,भागवताचार्य ह भ प सीमाताई राजेंद्र काळे चांदवड, माजी सभापती शिवा पाटील सुरासे निफाड, निफाड तालुका भाजपा अध्यक्ष ह भ प भागवत बाबा बोरस्ते साकोरे मिग यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी डी वाय एस पी पाटील , हभप पुंडा बापु ् देशमुख, श्रावण नाना आवारे, हरिभाऊ आवारे शिंदी,
धर्माचार्य हभप निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव, ह भ प विठ्ठल महाराज जाधव वैजापूरकर, ह भ प नारायण महाराज काळे कानडी, ह भ प भाऊसाहेब महाराज भवर बेहेड, ह भ प रतन बाबा ठोंबरे, राजेंद्र महाराज काळे चांदवड, भागवताचार्य हभप विठोबा दादा आवारे शिरवाडे ,भागवताचार्य हभप सिमाताई राजेंद्र काळे चांदवड, भागवताचार्य हभप कविता ताई पगार,भागवताचार्य हभप संगिता माई गुंजाळ लासलगाव, हभप दत्तात्रय पाटील डुकरे ,हभप विठ्ठल आण्णा शेलार, ह भ प बाबाजी कुशारे, हभप सौ स्मिताताईं कुलकर्णी विश्वस्त ब्राह्मण महासंघ, भागवताचार्य ह भ प राजेंद्र महाराज चव्हाण ह भ प ज्ञानेश्वर महाराज ठाकरे, ह भ प भास्कर आबा मांजरे धामोरी, ह भ प लक्ष्मण पडोळ सर,हभप निवृत्ती महाराज कापसे येवला, हभप सुनील वाघ रानवड, ह भ प केदू नाना शेळके शिरवाडे, ह भ प जयाताई निचित सोनेवाडी आदींसह येवला, सिन्नर, निफाड ,दिंडोरी ,नासिक, चांदवड, नांदगाव ,मालेगाव ,देवळा ,सटाणा, कोपरगाव आदी तालुक्यातील भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश महाराज गायकवाड यांनी तर उपस्थितांचे आभार व जालिंदर वाघ काजी सांगवी यांनी मानले.

error: Content is protected !!