जीवनात कुसंगती टाळुन संत संगती केली पाहिजे-रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर

0 15

निफाड,दि 24 ः
प्रतिनिधी रामभाऊ आवारे
परमेश्वराने मानवाला सुंदर नरदेह दिला असून त्या नरदेहाचा उपयोग आपण नामस्मरण व जीवनाच्या उद्धारासाठी केला पाहिजे परंतु हे करत असताना जीवनाच्या उद्धारासाठी कुसंगती पेक्षा सत संगत अत्यंत महत्त्वाची आहे असे किर्तन रुपी सेवेचे सुंदर निरूपण करताना नामवंत रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर बुलढाणा यांनी केले आहे.
सावरगाव तालुका निफाड येथे आयोजित खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त ५१ वर्ष गादी ग्रहण सोहळा व किर्तन महोत्सव कार्यक्रमात ” हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा” या गोड अभंगावर चिंतन करताना त्यांनी सुतवाच केले आहे.
गोड अशा कीर्तनरुपी सेवेच्या चतुर्थ दिनी संत तुकोबारायांच्या हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या अभंगाद्वारे उपदेश करताना ते पुढे म्हणाले की, आपल्याला जीवनामध्ये जागं करणारी माणसं खुप महत्वाची असुन कोणीतरी जागे करणारे पाहिजे ख-या
अर्थाने आपल्याला ज्ञानोबा, तुकोबा, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज,संत नामदेव महाराज, संत मुक्ताई, जनाई आदींनी जागे केले आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात की मला तुम्ही हेच दान द्या की मला तुमचा विसर पडू नये. देवाकडे मागणी करताना त्यांनी सांगितले की, मागणी मागणा-या हात खाली असतो देणा-याचे हात वर
हात पसरविणे चांगली गोष्ट नाही.आपण जे मागतो तेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी मागतात.साधू- देव किंवा लोकांसाठी मागतात.आई आपल्या मुलांसाठी देवाकडे मागणी करते. चांगल्या मुलांसाठी न मागता जो मुलगा आपला रस्ता चुकलेला आहे त्याची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची आहे तो आजाराने जर्जर आहे अशा मुलासाठी मागत असते.आळंदी ची आई पण स्वतः साठी काही मागत नाही तर आपल्यासाठी मागत आहे.

किर्तन हे उद्धारासाठी करायचा आहे.न लगे मुक्ती धनसंपदा ..प्रापंचिक लोक देवाकडे संपत्ती मागतात. परमेश्वराने दिलेल्या सुंदर नरदेहाचा उपभोग करण्यासाठी व आपले जीवन सार्थकी लागण्यासाठी संतांची संगत महत्वाची.कुसंगापासुन दुर रहा.कुसंगती- टाळली पाहिजे, विसंगती भोगली पाहिजे,सत्संगती केली पाहिजे. या सुंदर शब्दात त्यांनी विविध उदाहरणे, दाखले ,प्रमाण, सिद्धांत देऊन उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी गायीच्या चाऱ्यासाठी स्वईच्छेने काही भाविकांनी आपली रक्कम सुपूर्त केली. यामध्ये राम विजय क्लिनिक व पॅरॅलिसिस केअर सेंटर वनसगावचे मुख्य संचालक डॉ योगेश डुंबरे यांनी ५१००, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका ह भ प सुवर्णामाई जमधडे येवला ३१०० रुपये, दत्तू काका राऊत चांदवड २१०० रुपये आदी भाविकांनी आपली स्वईच्छेने देणगी दिली.
या कीर्तनासाठी संगीत साथ हभप ओंकार महाराज रायते खडक माळेगाव तर गायनाची साथ हभप नवनाथ महाराज चव्हाण रेडगाव, हभप मिलिंद महाराज अजंग वडेल, त्याचप्रमाणे ह भ प जाधव महाराज जोपुळ यांनी साथ केली तर ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था बल्लेगावच्या बालगोपाल भजनी मंडळांनी उत्कृष्ट पद्धतीने सहभाग नोंदवला.
यावेळी वैराग्य मुर्ती दताबाबा, हभप सुवर्णा माई जमधडे, दत्तू काका राऊत ,संजय आव्हाड चांदवड,पांडुरंग गडकरी शिवनई, शिवाजी जगताप मरळगोई, रतन सेठ व्यवहारे, लक्ष्मण अण्णा शिंदे, काका तात्या शिंदे, कचरू नाना शिंदे, बाबजी नाना शिंदे, डॉ योगेश डुंबरे ,पत्रकार रामभाऊ आवारे , टी जी शिंदे सर, योगेश शिंदे ,दत्ता शिंदे ,जगन्नाथ करेकर ,शरद शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे ,परसराम शिंदे, दत्तू काका शिंदे, शांताराम शिंदे आदींसह पंचक्रोशीतील भाविक व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ‌‌. आभार ह भ प बाबाजी पाटील कुशारे माजी सरपंच सावरगाव यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!