तान्हाजी मालुसरेसारख एकनिष्ठ रहा-सुनील महाराज आष्टीकर
लोहा, प्रतिनिधी – भगवान बालाजी नवरात्र महोत्सवाला यावर्षी चांगलीच रंगत आली आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही लोहा नगरीतील भक्त मनोरंजना सोबत भक्ती रसाचा आनंद घेत आहेत. तसेच मराठवाडय़ातील सुप्रसिद्ध भागवताचार्य नारदिय किर्तनकार ह भ प सुनील महाराज आष्टीकर यांच्या नारदिय किर्तनाने एक अलौकिक रंगत भरत आहे.
दररोज नवीन आख्यान कधी पौराणिक तर कधी ऐतिहासिक काल महाराजांनी छञपति शिवाजी महाराजांच्या मावळ्यातिल जेष्ठ सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा एकनिष्ठ पणा कसा होता. हे श्रोत्यांना समजावुन सांगितले ऐहिस सुखाचा त्याग करून तान्हाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली व शिवरायांच्या धर्म संस्थापने च्या कार्यात आपला मोलाटा वाटा दिला. परिणामी रायबचं लग्न महत्त्वाचे नसुन छत्रपतिचं कार्य महत्त्वाचं आहे अस जाणुन किल्ले कोंडाना शेलार मामाच्या संगतिने सर करून उदयभानाला संपवुन कोंडाना जिंकता जिंकता प्राणज्योत केव्हा मावळली तान्हाला कळलेच नाही. जसे राजाला कळाले तसे शिवाजी महाराज जवळ आले व महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले अरे गड आला पण सिंह गेला. समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक या विषयावर बोलतांना सुनील महाराज आष्टीकर यांनी सांगितले कि देह त्यागिता किर्ति मागे ऊरावी जसा तानाजी एकनिष्ठ राहिला. तसेच आपण आपल्या माति साठी एकनिष्ठ रहावं असा मोलाचा सल्ला महाजनांनी दिला संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी मंदिर सेवा समिती कार्यरत आहे.