फायद्याची गोष्ट : एकदाच पैसे जमा करा आणि आयुष्यभर पेन्शन मिळवा
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यामुळे आर्थिक संकट मोठी समस्या बनली आहे. जरी आता संसर्गाचा वेग कमी झाला आहे, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. शासकीय आणि अशासकीय संस्थाही आर्थिक नुकसानीच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही सरकारी संस्था एक योजना घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून दरमहा पेन्शनचा लाभ घेऊ शकता.
एलआयसीच्या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना (saral pension scheme) आहे, ज्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्हाला एकदा प्रीमियम भरावा लागेल. मग तुम्हाला आजीवन पेन्शन मिळेल.
असा घ्या फायदा
एलआयसी सरल पेन्शन प्लॅनचे दोन प्रकार आहेत पहिल्या लाइफ एन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेज प्राइज आणि दुसरा पेन्शन जॉइंट लाइफ आहे.
कोणाच्या नावे पॉलिसी
यामध्ये, पॉलिसी कोणत्याही एकाच्या नावावर असेल, म्हणजेच ही पेन्शन पॉलिसी एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पॉलिसीधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पॉलिसी मिळत राहील. त्यानंतर नॉमिनीला बेस प्रीमियम मिळेल.
पती -पत्नींपैकी कोणालाही पेन्शन मिळत राहील
या योजनेत पती-पत्नी दोघांनाही कव्हरेज आहे. यामध्ये, जो जोडीदार सर्वात जास्त काळ राहिल, त्याला पेन्शन मिळते, जेव्हा दोघेही नसतील, तेव्हा नॉमीनी व्यक्तीला मूळ किंमत मिळेल.
पॉलिसीची वैशिष्ट्ये
विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्याचे पेन्शन सुरू होईल.आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की, तुम्हाला दरमहा किंवा तिमाहीत पेन्शन हवी आहे, अर्धवार्षिक किंवा वार्षिक. तुम्हाला हा पर्याय स्वतः निवडावा लागेल.
ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेता येते. या योजनेत किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. ही योजना 40 ते 80 वर्षांच्या लोकांसाठी आहे.
या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर कधीही कर्ज मिळेल.