राष्ट्रवादीच्या आ.बाळापूर शहराध्यक्ष पदी अनिल बोढारे

0 90

आखाडा बाळापूर, प्रतिनिधी – येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल सदाशिवराव बोढारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली .

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी त्यांची निवड केली.अनिल बोढारे हे अनेक वर्षांपासून सामाजिक ,राजकीय चळवळीत काम करत आहेत ,तसेच ग्रामपंचयत सदस्य राहिलेले अनिल बोढारे यांचा राष्ट्रवादी ला चांगला लाभ होईल असा आशावाद ही दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केला .

शहराध्यक्ष पदी निवड झाल्याचे पत्र त्यांना देण्यात आले .या वेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण ,डॉ.संतोष बोढारे,शिवाजी शिंदे,बाबुराव वानखेडे,अभिजित देशमुख,श्रीकांत वाघमारे,दीपक बोढारे,डॉ.ओंकार चव्हाण,विठ्ठल नागरगोजे,आदींची उपस्थिती होती.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!