गरबा रसिकांसाठी मोठी बातमी..आता
गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. तरुणांना आता फक्त दोन नाही तर तीन दिवस लेटनाईट गरबा खेळता येणार आहे. रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यासाठी परवानगी मिळालीये.
याआधी गरबा खेळण्यासाठी फक्त २२ आणि २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी होती. मात्र आता गरबा प्रेमिंच्या मागणीमुळे २१ ऑक्टोबरलाही रात्री १२ वाजेपर्यंत गरब्यास पोलिसांनी परवानगी दिलीये.
२१, २२ व २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे तरुणाईचा आनंद द्विगुणीत झालाय. आमदार प्रवीण दरेकर यांनी याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. नवरात्रीच्या काळात दोन ऐवजी तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा दांडिया खेळायला परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली होती.
नवरात्रीच्या काळात दिवसाला दीड लाख लोक गरबा आणि दांडिया खेळायचा आनंद घेतात. त्यामुळे या सर्व रसिकांना खेळासाठी आणखी एक दिवस रात्री १२ पर्यंत आवाजाची मर्यादा शिथील करण्यात आलीये. यामुळे गरबा रसिकांनी मोठा आनंद व्यक्त केलाय.