फिनकिड्स मध्ये चिमुकल्यांचा ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा
सेलू (नारायण पाटील)
येथील सॅंनरो एज्युकेअर प्रायव्हेट लिमिटेड संचलित, फिनकिड्समध्ये ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक, डॉ.संजय रोडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रगती क्षीरसागर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री. प्रशांत ढोके, श्री. रामेश्वर काळे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते .
फिनकिड्स स्कूलमधील Sr.kg या वर्गातील विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला .डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते चिमुकल्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाअंतर्गत विविध गेम , डान्स, सेल्फी पॉइंट यासारखे करमणुकीच्या इत्यादी घटकांचा समावेश होता. अनेक चिमुकल्यांनी स्कूल बद्दल मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपा सावंत यांनी केले. तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.