सोमेश्वर विद्यालय गौर येथील लिपिक नवनाथ पारवे यांचा सेवापूर्ती सोहळा
पुर्णा – पुर्णा गौर तालुका पुर्णा येथील प्रतिभावान पत्रकार तसेच सोमेश्वर विद्यालय गौर चे लिपिक नवनाथ पारवे हे आपल्या नियत वयोमानानुसार दि31जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमि्ताने दी 31जुलै रोजी त्यांचा सेवागौरव सोहळा सोमेश्वर विद्यालय गौर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी सर्व मित्र, नातेवाईक, समाजमाध्यम प्रतिनिधी यांनी अगत्यपूर्वक हजर राहावे अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
श्री पारवे यानी आपल्या 31वर्षांच्या कार्य काळात शाळेच्या विविध अंगी विकासासाठी तन मन धनाने सहकार्य करीत सदर संस्थेचे वटवृक्षात रूपांतर करण्यात सिंहाचा वाटा असुन सेवागौरव समारंभाच्या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत येतो आहे.