साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्य शैक्षणिक साहित्य वाटप
पाथरी तालुक्यातील सारोळा (खु) गावातील वैराळे परिवाराचे स्तुत्य उपक्रम
पाथरी, प्रतिनिधी – फोटो व पुतळ्यासमोर उभे राहून सेल्फी काढणे. चष्मा लावलेला प्लॅट बॅनर वरती लावून जयंती पुण्यतिथी असणाऱ्या थोर महापुरुषांना अभिवादन करण्यात धन्यता मानन्यात तरुण व्यस्थ आहे.थोरांचे विचार मात्र स्टेटस ठेवण्यापुरते उरले आहेत. अश्यात मात्र जर कोणी जयंती पुण्यतिथी निमित्य शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करत असतील तर ते नक्कीच आदर्श घेण्यासारखे कार्य आहे.
पाथरी तालुक्यातील सारोळा (खु) येथे सखाराम किशनराव वैराळे व दिपक सखाराम वैराळे यांनी दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्य गावातील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून युगपुरुषानां विचारांची मानवंदना देऊन समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केले आहेत.
शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू सिताफळे- उपसरपंच खेर्डा, तर प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव सिताफळे हे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खोसे व्ही.एम., शालेय व्यावस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सहा.शिक्षक प्रवीण प्रधान व अतुल खांडे, रत्नाकर मोगरे, वैराळे , काळे, आबुज, खंडागळे, रोकडे, गायकवाड, कांबळे, शेख परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या नंतर गावात होणारे सर्व जयंती पुण्यतिथी अशाच पद्धतीने वैचारिक पातळीवर साजरा करून मानवंदना देण्याचे सर्व गावकऱ्यांनीबोलून दाखविली. सूत्रसंचालन व आभार अतुल खांडे यांनी केले.