माखणी येथे मोफत आरोग्य शिबीरात २१० रुग्णांची तपासणी

0 114

पूर्णा,ता.१७ 
मनुष्याने नेमून दिलेले काम व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास यशाचे शिखरे सर करता येतात नेहमी आपल्याच कामात मग्न रहावे असे आवाहन जिल्हा आरोग्यआधिकारी डॉ. जयश्री यादव यांनी केले .
माखणी (ता .पूर्णा) येथील हनुमान मंदिर परीसरात आर्युवेद व्यासपीठ परभणी द्वारा भाजीपाला ग्रूप व ओंकार गृह उद्योग माखणी यांच्या सयूक्त विद्यमाने कै . गंगाधरदादा पवार यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर शुक्रवार (ता . १७) घेण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा तृप्तीताइ वरपुडकर , मार्गदर्शक डॉ. दत्तात्रेय मगर , जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.जयश्री यादव , पोलीस निरीक्षण प्रदीप काकडे , सुमनबाई पवार , विजय पवार , डॉ. विद्या भालेराव , डॉ. बरखा देशमुख (मुंबई), धाराजी भुसारे ,सरपंच गोविंद नाना आवगंड , पंडीत थोरात , प्रकाश हरकळ , पुरुषोत्तम पवार , रेमेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती .
आरोग्य शिबिरात २१० रुग्णाची तपासणी करण्यात आली . शिबिरासाठी डॉ. मंजुषा कान्हे,डॉ. संदिप चव्हाण , डॉ.अंजली निरस , डॉ. मुक्तेश्वर पारवे , डॉ.अश्विनी कवठेवार, डॉ. शिवानी आवरगंड अदीनी उपचार केले .
पुढे बोलतांना डॉ. मंजुषा कान्हे म्हणतात मानवाला जबाबदारी घडवते म्हणूनच तो चांगुलपणा सिध्द करण्यासाठी जिव्हाळा जोपासतो कर्म करतो त्यालाच देवमाणूस म्हणतात असे विच्यार मांडले.
आरोग्य शिबिरात गुणवंत शिक्षक राम महाजन व गजानन पवार यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला .कार्यक्रमासाठी गावकऱी मंडळी, पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्धन आवरगंड यांनी केले सूत्रसंचालन माधव आवरगंड आभार शिवाजी आवरगंड यांनी केले .

error: Content is protected !!